अमित शाह म्हणाले, काळजी करू नका सरकार भाजपचेच येईल: रामदास आठवलेंचा दावा

नवी दिल्ली : शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी कंबर कसलेली असताना केंद्रिय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी माहिती देताना म्हटले आहे की, आपण राज्यातील सरकार स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शाह यांना लक्ष घालण्याची विनंती केली असत ते म्हणाले, काळजी करू नका. भाजपा-शिवसेना राज्यात सरकार स्थापन करेल, असा दावा आठवले यांनी केला आहे.

“तुम्ही मध्यस्थी केली तर एखादा मार्ग निघू शकतो, असे आपण अमित शाह यांना बोललो. त्यावर ते म्हणाले की, काळजी करू नका. सर्वकाही ठिक होईल. भाजपा आणि शिवसेना सरकार स्थापन करण्यासाठी एकत्र येतील, असे त्यांनी सांगितल्याची माहिती आठवले यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला सरकार स्थापनेचा जनादेश मिळाला होता. मात्र, मुख्यमंत्रीपदासह सत्तेच समसमान वाटप करा, अशी मागणी शिवसेनेने केली होती. त्यावर मुख्यमंत्रीपदाबद्दल कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी भूमिका भाजपानं घेतली होती. त्यामुळे दोन्ही पक्षातील संवाद पूर्णपणे थांबला होता. त्यानंतर शिवसेनेने भाजपासोबत न जाण्याचा निर्णय घेतला.