पुलवामा हल्ल्यातील शहिदांचा बदला घेणाऱ्या वायुसेनेला अमित शहांचा सलाम

Amit Shah

नवी दिल्ली : देशाला हादरवून सोडणाऱ्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचा बदला घेणाऱ्या वायुसेनेच्या जवानांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सलाम केला आहे. 14 फेब्रुवारी 2019 साली झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे (CRPF) चे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर 12 दिवसांनी भारतीय वायुसेनेच्या 10 मिरज विमानांनी नियंत्रण रेखा ओलांडून जैश या आतंकवादी संघटनेच्या तळांना उद्धवस्त केले होते. याच पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहत भारतीय वायुसेनेच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

आज 2019 मध्ये भारतीय वायू सेनेने पुलवामा दहशतवादी हल्ल्याला उत्तर देत नवीन भारताचे दहशतवादाविरूद्धचे धोरण पुन्हा स्पष्ट केले होते. मला पुलवामामधील शूर शहीदांची आठवण आहे आणि हवाई दलाच्या पराक्रमाला सलाम करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश आणि आमच्या सैनिकांची सुरक्षा सर्वोपरि आहे. असे अमित शाह म्हणाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER