अमित शहा तर निघून गेलेत पण, सिंधुदुर्गात राणे – शिवसेना वाद पेटला

Nilesh Rane - Amit Shah - Vinayak Raut

सिंधुदुर्ग :- भाजपचे (BJP) चाणक्य, देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) नुकतेच कोंकण दौ-यावर आले होते. त्यांच्या दौ-याचा खुप गाजावाजाही झाला होता. मात्र, अमित शहांच्या येण्याने महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi) तर फारसा परिणाम झाला नाही परंतु, राणे – शिवसेना वाद चांगलाच टोकाला गेला आहे.

अमित शहा येऊन गेल्यानंतर कोंकणातील भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शहांच्या दौरा व शिवसेनेत इनकमिंग यावरून राणे – राऊत यांच्यात चांगलीच जुंपली.

आता हे प्रकरण इथपर्यंत गेले आहे की, कणकवलीत दंगल नियत्रंण पथके तैनात करण्यात आलीत. खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत दंगल नियंत्रण पथके तैनात केली गेली असून, पोलीसही सज्ज झालेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सिंधुदुर्गात येत थेट शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला अंगावर घेतले होते. त्यालाच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर विनायक राऊत आणि निलेश राणेंच्या वादाला सुरुवात झालीय. तोच वाद सिंधुदुर्गात शिगेला पोहोचला आहे.

भाजप नेते निलेश राणेंनी खासदार विनायक राऊत यांना धमकी दिल्यापासून सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राणेंच्या धमकीनंतर शिवसैनिक थेट रस्त्यावर उतरले आहेत. जिल्हाभरातील कार्यकर्ते एकवटले असून, निलेश राणेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला होता. निलेश राणेंवर निवेदनाद्वार कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे केली. निलेश राणेंच्या अशा सततच्या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली तर निलेश राणे जबाबदार राहणार असल्याचंही या नेत्यांनी म्हटलं होतं. या वक्तव्याची गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करावी, असंही शिवसेनेचे सतीश सावंत म्हणाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER