कारवाई करताना गुन्हेगाराचे वय पाहता कामा नये : अमित शहा

नवी दिल्ली :- ट्विटर टूलकिटसंदर्भात दिशा रवी (Disha Ravi) हिला अटक करण्यात आली. या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचे प्रथमच वक्तव्य समोर आले. अमित शहा यांनी दिल्ली पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले आहे. कारवाई करताना गुन्हेगाराचे वय पाहता कामा नये, असे अमित शहा यांनी म्हटले आहे. त्यांना किसान आंदोलनात खलिस्तानी लिंक टूलकिटप्रकरणी काही प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नाला उत्तर देताना अमित शहा म्हणाले की, “पोलीस आपली जबाबदारी आणि काम योग्य पद्धतीने करत आहेत.

कोणत्याही व्यक्तीने गुन्हा केला, तर त्याचे वय आणि प्रोफेशन पाहावे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. कारवाई करताना वय, प्रोफेशन पाहणे चुकीचे आहे. यात कोणाला चुकीचे वाटत असेल, तर त्यांनी न्यायालयात जावे. कायदेशीर कारवाईवर टीका करणे, प्रश्न उपस्थित करणे, हे फॅशन झाली आहे. कोणतीही तपास संस्था प्रोफेशनली काम करत असेल, तर सवाल उपस्थित करता कामा नये, असे अमित शहा यांनी सांगितले. देशभरात अनेकांचे वय २१ वर्षे आहे. पण दिशा रवी हिलाच का अटक करण्यात आली, असा प्रतिप्रश्न अमित शहा यांनी केला आहे.

मीडियामध्ये कोणतीही गोष्ट लीक नाही
शेतकरी आंदोलनप्रकरणात जारी करण्यात आलेल्या टूलकिट प्रकरणी दिशा रवी हिला अटक करण्यात आली. दिशाच्या तपासाचा कोणताही तपशील मीडियामध्ये लीक करण्यात आलेला नाही, असे पोलिसांनी उच्च न्यायालयात स्पष्ट केले. यासंदर्भात दिशाकडून न्यायालयात विनंती अर्ज दाखल करण्यात आला होता. तपासाची माहिती मीडियामध्ये लीक होणार नाही, असे पोलिसांना निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER