लसीच्या कमतरतेचे अहवाल चुकीचे; राज्यांना पुरेसे डोस दिलेत : अमित शहा

नवी दिल्ली :- देशात लसींच्या (Corona Vaccine) तुटवड्यामुळे लसीकरण मोहीम ठप्प होते की काय अशी परिस्थिती आहे. अनेक राज्यांमध्ये लसीकरणाचे बुथ बंद करण्यात आले आहेत. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी राज्यांना पुरविलेल्या लसींच्या कमतरतेबाबतचा अहवाल चुकीचा असल्याचे सांगितले. तसेच सर्व राज्यांना पुरेसे लसीचे डोस उपलब्ध करून दिले आहेत, असेही अमित शहा यांनी सांगितले आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी गुरुवारी राज्यांना किती प्रमाणात लसीकरण दिले आहेत, याची आकडेवारी जाहीर केली. मात्र, महाराष्ट्रासह इतर राज्यांना लसींचा तुटवडा जाणवल्यामुळे लसीकरणाची मोहीम ठप्प करावी लागते की काय अशी भीती व्यक्त होत आहे. महाराष्ट्रासह, दिल्ली, तेलंगणा आंध्रप्रदेश, ओडिसा, छत्तीसगड या राज्यांत लसींचा तुटवडा झाल्याने मोहीम थांबण्याची शक्यता आहे.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्रासह इतर राज्यातही लसीकरणर ठप्प, लसीसाठीचा कच्चा माल अमेरिका, युरोपनं थांबवला

ओडिशात ७०० लसीकरण केंद्रे बंद
लसीच्या कमतरतेमुळे ओडिशामध्ये १४०० पैकी ७०० लसीकरण केंद्रे बंद केल्याची माहिती आहे. राज्यात केवळ दोनच दिवस पुरेल एवढा लसींचा साठा शिल्लक असल्याची माहिती आहे. त्यामुळे लसींचा साठा ठप्प होण्याची चिन्हे आहेत. लसीकरण बंद होईल की काय, अशी भीती आरोग्यमंत्री नब किशोर दास यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात लसीवरून राजकारण
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी लसीकरणावरून महाराष्ट्राला फटकारले. मात्र, अनेक नेत्यांनी केंद्र लसीकरणाच्या बाबतीत दुजाभाव करत असल्याची टीका केली आहे. केवळ ७.५ लाख लसींचा पुरवठा केला आहे. इतर राज्यांना ४० लाखांहून अधिक लसींचे डोस दिले आहेत. यात राजकारणाचा मुद्दा नाही; पण ज्या पद्धतीने पुरवठा केला जात आहे, ते योग्य नाही. दर आठवड्याला आम्हाला ४० लाख डोस द्या, यापेक्षा जास्त काहीच मागणी नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : लसीकरणाचा उत्सव नक्कीच करू, पण आधी लस तर द्या; जयंत पाटलांचा खोचक टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button