आंदोलक शेतकऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून चर्चेचं आवाहन

Amit Shah

नवी दिल्ली :- केंद्र सरकारच्या (Central Government) कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलक शेतकऱ्यांना शांत करण्यासाठी आता गृह मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी संदेश दिला आहे. अमित शाह यांनी आंदोलक शेतकऱ्यांना चर्चेचं आवाहन केलं आहे.

‘पंजाबच्या सीमेपासून ते दिल्ली-हरियाणा बॉर्डरवर वेग-वेगळ्या शेतकरी संघटनांच्या आवाहनावरून आज जे शेतकरी बांधव आंदोलन करत आहेत, त्या सर्वांना मी सांगू इच्छितो, की भारत सरकार आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी तयार आहे’. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आंदोलक शेतकऱ्यांना 3 डिसेंबरला चर्चेसाठी बोलावलं आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या सर्व समस्या आणि मागण्यांवर चर्चा करण्यासाठी तयार आहे’, अशा शब्दात अमित शाह यांनी आंदोलक शेतकऱ्यांना चर्चेसाठी आमंत्रित केलं आहे.

वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर शेतकरी बांधव आपले ट्रॅक्टर-ट्रॉलीसह एवढ्या थंडीत उघड्यावर बसले आहेत. या सर्वांना मी आवाहन करतो, की दिल्ली पोलीस आपणा सर्वांना एका मोठ्या मैदानावर स्थलांतरित करण्यास तयार आहेत. जेथे आपल्याला सुरक्षा व्यवस्था आणि सुविधा मिळतील, असे शाह म्हणाले. तसेच आपण रोडऐवजी निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणी आपले धरणे आंदोलन शांततामय आणि लोकशाही पद्धतीने कराल, तर शेतकरी आणि ये-जा करणाऱ्या सामान्य नागरिकांनाही त्रास होणार नाही, असेही शाह म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER