कोरोना लसीकरण संपताच नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करणार – अमित शहा

कोलकाता : देशातील कोरोना लसीकरण (Corona vaccination) मोहीम आटोपताच नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला जाणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केली. नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत (CAA) निर्वासितांना नागरिकत्व दिलं जाणार आहे. अमित शाह सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असून, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी सभा घेत आहेत. पश्चिम बंगालमधील ठाकुरनगर याठिकाणी रॅलीमध्ये बोलत असताना अमित शाह यांनी ही सीएएबाबतची घोषणा केली. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावर टीका करत आता त्यांची वेळ संपली असल्याचं म्हटलं आहे.

सीएए विषयी चुकीची माहिती देणारे लोकं येथे आहेत. पण मी बंधू शंतनू ठाकुर (बोंगाव याठिकाणचे भाजप खासदार) यांना म्हटले होते की मी स्वत: येईन आमि सर्व शंका दूर करेन. मी काही दिवसांपूर्वी येऊ शकलो नाही याचा ममता दी यांना खूप आनंद झाला होता. पण मला त्यांना सांगायला आवडेल की पुन्हा आणि पुन्हा येईल जोपर्यंत मी बंगालला त्यांच्या चुकीच्या नेतृत्वापासून मुक्ती मिळवून देणार नाही, ठाकुरनगरच्या रॅलीमध्ये बोलताना शाह यांनी अशाप्रकारे ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले होते. याठिकाणी मतुआ या रेफ्यूजी समाजाचे वर्चस्व आहे, ज्यांनी 2019 मध्ये भाजपला पाठिंबा दिला होता.

अमित शाह पुढे असं म्हणाले की, आज भारताचे केंद्रीय गृहमंत्री म्हणून मला या पवित्र भूमितून असे जाहीर करावेसे वाटते की सीएए कायदा माझ्या मुस्लिम बांधवांचे नागरिकत्व काढून घेणार नाही. सीएएमध्ये असे करण्यासाठी कोणतेही कलम नाही. हा कायदा नागरिकत्त्व देणारा आहे, ते काढून घेणारा नाही. 2028 मध्ये, आम्ही आमच्या मतुआ बंधू-भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी वचन दिले होते की आम्ही नागरिकत्व कायदा आणू. 2019 मध्ये मतुआच्या बंधू-भगिनींना आम्हाला पूर्ण पाठिंबा दिल्यानंतर आम्ही आमचे वचन पूर्ण केले. आज, मी तुम्हाला खात्री देतो की कोव्हिड-19 लसीकरण प्रक्रिया संपल्यानंतर आम्ही सीएएची अंमलबजावणी करू.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER