आज अमित शाह कोकणात; महाआघाडीत ‘ऑपरेशन लोटस’ची भीती?

Amit Shah-CM Uddhav Thackeray

मुंबई :- राज्यातील राजकरणात मोठ्या हालचाली होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे . एकीकडे विधानसभा अध्यक्षपदाचा नाना पटोलेंनी (Nana Patole) राजीनामा दिला आणि त्याच काळात फडणवीसांनी शिडी न लावता फासे पलटवण्याची घोषणा केली. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanajy Raut), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काँग्रेसला सुनावण्याची संधी सोडली नाही. आता चर्चा आहे ती राज्यात सत्तापालट होणार की काय याची. तशी संधीच काँग्रेसने दिल्याची भीतीही आघाडीच्या नेत्यांकडून ऐकायला मिळतेय. त्यातच शाह आज सिंधुदूर्गात आहेत. त्यामुळे राजकीय चर्चा राजकीय वर्तुळ रंगल्या आहेत .

आघाडीने 169 आमदारांसह विधानसभेत बहुमत सिद्ध केले आहे. त्यानंतर काँग्रेसकडून नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्षही झाले. आता पुन्हा विधानसभेत अध्यक्षाची निवड होईल त्यावेळेस बहुमताचीही कसोटी लागेएल. म्हणजे का अर्थाने पुन्हा एकदा आकडे सिद्ध करावे लागतील.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिडी न लावता फासे पलटवू असं म्हटलं आहे. त्यानंतर आता अमित शाह महाराष्ट्रात येत आहेत. नारायण राणेंनी तर शाहांच्या पायगुणांनी हे सरकार जावं असं म्हटलं आहे. राणे पहिल्यापासूनच हे सरकार पाडण्यासाठी किंवा ते खिळखिळं करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तशी वारंवार ते वक्तव्यही करतात. त्यामुळे अध्यक्ष निवडताना आघाडीला धक्का देण्याची संधी आल्याचे विरोधकांना वाटते आहे.

ही बातमी पण वाचा : फडणवीस यांना स्वप्नेच बघावी लागतील, शिवसेनेचे सुभाष देसाई यांचा टोमणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER