अमित शाह यांनी मिशन काश्मीरसाठी पाठविले या विशेष अधिका-याला

Amit Shah

नवी दिल्ली :- केंद्रात गृहमंत्रीपद सांभाळल्यानंतर अमित शाह सतत तत्पर आहेत. त्यांची कृती बघून तरी वाटते कि काश्मीर आणि आंतरिक सुरक्षेचा मुद्दा त्यांच्यासाठी सर्वोच्च प्राथमिकता आहे. काश्मीरसाठी त्यांनी फारूख खान यांची राज्यपालांचे सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे.

फारूख हे जम्मू-काश्मीरात पोलिस महानिरीक्षक (आयजी) पदाहून सेवानिवृत्त झाले आहे. त्यानंतर ते लक्षद्वीप येथे प्रशासक पदावर तैनात होते. जेव्हाकि फारूख यांच्या राजीनाम्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

काश्मीर मुद्दाला सोडविण्याच्या दिशेने अमित शाह यांच्या या पावलाला एक आणखी मास्टरस्ट्रोक मानल्या जात आहे. फारूख हे दहशतवाद विरोधी धोरण आणि सुरक्षा संबंधी मुद्दांवर राज्य प्रशासनाला सल्ला देतील. दहशतवादाचा सामना करण्याचा फारूख यांच्या जबरदस्त रेकॉर्ड आहे. त्यामुळेच त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना राज्यातील प्रामाणिक आणि निष्ठावान पोलिस अधिकारी मानल्या जाते. दहशतवाद्यांप्रती त्यांचा झिरो टॉलरन्सचा दृष्टिकेनही प्रसिद्ध आहे.

जेव्हा फारूख यांना विचारल्या गेले की ते काश्मीरला परत येऊ इच्छितात की त्यांना लक्षद्वीप येथेच राहायचे आहे. त्यावर त्यांनी म्हटले की सरकारच्या इच्छेनुरूप ते देशाच्या सेवेस तयार असल्याचे बोलले जात आहे.