केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना ‘एम्स’मधून डिस्चार्ज

Amit Shah discharged from AIIMS

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना आज सकाळी 7 वाजता एम्स (AIIMS) हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. थकवा आणि अंगदुखीचा त्रास होत असल्याने शाहा यांना ‘एम्स’मध्ये अ‍ॅडमिट करण्यात आले होते. जवळपास दोन आठवड्यांच्या उपचारानंतर शाह बरे होऊन घरी परतले आहेत.

 

केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची आधी कोरोनाची टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांना पोस्टकोविड लक्षणे दिसत असल्याने अमित शाह यांना 18 ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ‘एम्स’चे संचालक आर गुलेरिया यांच्या निगराणीखाली शाह होते. तेरा दिवसांच्या उपचारानंतर अमित शाह यांना घरी सोडण्यात आले.

2 ऑगस्ट रोजी शहा यांना कोरोना झाल्याचे समजले. बारा दिवसांच्या उपचारानंतर 14 ऑगस्टला शाह यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER