अमित शहा यांना एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज

Amit Shah

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना गुरुवारी एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ते सोमवारपासून संसदेच्या कामकाजात सहभागी होऊ शकतात. कोरोनावर मात केल्यानंतर श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असल्यानं त्यांना शनिवारी रात्री ११ वाजता एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं.

मात्र आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. अमित शहा यांच्यावर  एम्सच्या कार्डियो न्युरो टॉवरमध्ये उपचार करण्यात आले. याआधी कोरोनानंतरच्या उपचारांसाठी शहा एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना ३१ ऑगस्टला डिस्चार्ज मिळाला. यानंतर त्यांना श्वासोच्छवास घेण्यास अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे त्यांना शनिवारी एम्समध्ये दाखल करण्यात आलं. उपचार घेत असतानाही त्यांनी रुग्णालयातूनही काम बघितले होते.

कालच त्यांनी गुजरातमधल्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातील २२९ कोटींच्या जलपूर्ती योजनेचं व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भूमिपूजन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून देशभरात ‘सेवा सप्ताहा’चं आयोजन केलं गेलं आहे. याच उपक्रमाच्या अंतर्गत शहांनी योजनेचं भूमिपूजन केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER