खरा चाणक्य कोण? तुम्ही की शरद पवार? अमित शहांनी दिले ‘हे’ उत्तर

Amit Shah-Sharad Pawar

मुंबई :- निवडणुकीत दारुण पराभवानंतर अमित शहा  यांनी पहिल्यांदाच एका वृत्तवाहिनाला मुलाखत दिली. यावेळी त्यांना विचारण्यात आलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिलखुलासपणे दिले. यावेळी शहा यांना राजकाणातील खरे चाणक्य तुम्ही की शरद पवार, असा थेट प्रश्नही केला गेला. यावर अमित शहा यांनी दिलेले उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

घरभर चिठ्ठ्या वाटणाऱ्या राष्ट्रीय नेत्याबद्दल मी काय बोलणार? : शरद पवार

‘मी चाणक्यनीती खूप वाचली आहे. ती समजून घेण्याचा प्रयत्नही केला आहे. चाणक्य यांच्याइतका मी महान नसून तसा विचारही करू शकत नाही. भगवान कौटिल्य (चाणक्य) यांच्याशी होणाऱ्या तुलनेबाबत मी विचारही करू शकत नाही. शरद पवारांबाबत बोलायचे झाल्यास ते दिग्गज राजकीय नेते आहेत. त्यांनी अनेक सरकारे पाडली आहेत. नवीन सरकारे स्थापनही केली आहेत.’ असे शहा म्हणाले.  सध्या अमित शहा यांची ही मुलाखत आणि चाणक्याशी तुलना केल्यावर दिलेले उत्तर व्हायरल झाले असून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.