केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोनामुक्त; ट्विट करत दिली माहिती

Amit Shah

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  (Amit Shah) यांचा कोरोना (Corona) चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अमित शहा यांनी खुद्द ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. “आज माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मी देवाचा आभारी आहे. या दरम्यान ज्यांनी माझ्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली, मला आणि माझ्या कुटुंबीयांना मानसिक पाठबळ दिलं, अशा प्रत्येकाप्रती मी मनापासून आभार व्यक्त करतो. मी आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणखी काही दिवस आयसोलेशमध्ये राहीन. ” असं अमित शहा म्हणाले.

अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान होताच त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. जवळपास दहा ते बारा दिवसांच्या उपचारानंतर शहा  यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांनी रुग्णालयाचे डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांचेदेखील आभार मानले आहेत. “कोरोनाविरोधात लढाईत मला मदत करणारे मेदांता रुग्णालयाचे सर्व डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांचा मी मनापासून आभारी आहे.” असं अमित शहा म्हणाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER