तुमची ‘ती’ इच्छा २०२१ ला पूर्ण होईल !

अमित शहा यांचे ममतांना झणझणीत उत्तर

Amit Shah answer to Mamata Banerjee

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्रातील भाजपा सरकार यांच्यातील संघर्ष वाढतच चालला आहे. केंद्राच्या सूचनांवर ममता बॅनर्जी चिडून म्हणाल्या होत्या की, केंद्र सरकारला पश्चिम बंगालच्या सरकारची इतकी अडचण होत असेल तर केंद्राने येथे येऊन राज्य सरकार चालवावे. यावर, येत्या विधानसभा निवडणुकीत तुमची सत्ता जाणार आहे, असे सूचित करताना अमित शहा यांनी ममताला उत्तर दिले की – ममताजी नाराज होऊ नका, २०२१ मध्ये भाजपा पूर्ण बहुमत मिळवून सत्तेत येईल. या संदर्भात उल्लेखनीय आहे की, कोरोनाच्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने राज्यात केंद्रीय पथक पाठविले होते. पश्चिम बंगालमधील सरकार कोरोनाची गंभीरपणे दखल घेत नाही आणि तेथे कोरोनाची साथ अनियंत्रित होत असल्याचा निष्कर्ष या पथकाने नोंदवला होता.

याबाबतच्या सूचनांवरून ममता बॅनर्जी ह्या अमित शहा यांना म्हणाल्या होत्या की, पश्चिम बंगालच्या सरकारचा जर तुम्हाला खूप त्रास झाला असेल तर फक्त अमित शहा यांनी बंगालचे सरकार चालवून दाखवावे. एका मुलाखतीत अमित शहा यांना मुलाखत घेणाऱ्याने याबाबत प्रश्न विचारला. उत्तरात शहा म्हणाले की – मी खासदार आहे म्हणून बंगालमध्ये जाऊन सरकार चालवू शकत नाही; पण, पश्चिम बंगालमध्ये भाजपाने सरकार चालवावे अशी ममता बॅनर्जींची इच्छा असेल तर ती इच्छा लवकरच पूर्ण होईल. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील लोक भाजपाला पूर्ण बहुमत देतील.

बंगालशी भांडण नाही
ममता बॅनर्जी यांनी स्थलांतरित मजुरांच्या ट्रेनला ‘कोरोना एक्स्प्रेस’ म्हटले होते. यावर गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, बंगालशी आमचे भांडण नाही. यूपीला १२०० हून अधिक गाड्या गेल्या. १००० पेक्षा जास्त गाड्या बिहारमध्ये गेल्या, पण बंगालमध्ये १०० ही ट्रेन गेल्या नाहीत. बंगालींना घरी जायचे असेल तर हा त्यांचा गुन्हा आहे का ?बंगालची जनता हे कायम लक्षात ठेवेल.

राहुल गांधींवर टीका
अमित शहा यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. म्हणालेत – राहुल गांधी सध्या एक योजना घेऊन फिरत आहेत. प्रत्येकाच्या खात्यात पैसे टाका सांगतात. जनतेने त्यांची योजना नाकारली आहे. मोदी सरकारने थेट डीबीटी अंतर्गत शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, विधवा यांच्या खात्यात पैसे टाकले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER