अमित शहा संसदेच्या अधिवेशनापूर्वी तपासणीसाठी एम्समध्ये दाखल

Amit Shah

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  (Amit Shah) यांना पुन्हा एकदा दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून शहा  यांना आरोग्यविषयक समस्या प्रकर्षाने जाणवत असल्याचे दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर काल त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना रात्री ११ वाजता एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता अमित शहा यांच्या प्रकृतीसंदर्भात एम्सकडून माहिती देण्यात आली आहे. संसदेच्या सत्रापूर्वी संपूर्ण वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती एम्सने दिली आहे.

सध्या अमित शहा  यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत; शिवाय, त्यांची प्रकृतीदेखील स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. मागील दीड महिन्यात तीन वेळा शहा  यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागलेले आहे. या अगोदर १८ ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर ३१ ऑगस्ट रोजी  डिस्चार्ज देण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER