येत्या काळात मोदी आणि बायडेन यांच्यात अमीत जानी ठरणार महत्वाचा दुवा

PM Narendra Modi - Amit Jani

मुंबई : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूकची सध्या जगभरात चर्चात आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा पराभव करत जो बायडेन (Joe Biden) विजयी ठरलेत. लवकरच बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्विकारतील. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी विजयी होण्यासाठी चांगलाच जोर लावला होता. मात्र बायडेन यांच्या विजयात अमीत जानींचा मोठा वाटा आहे. तसेच जानी हे नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) फॅन आहेत . यापार्श्वभूमीवर येत्या काळात पत्रप्रधान नरेंद्र मोदी आणि बायडेन यांच्यात अमीत जानी महत्वाचा दुवा ठरणार आहेत.

अमेरिकेत जानी यांच्यावरून बायडेन यांच्यावर टिकाही झाली. भारतात कट्टर हिंदुत्ववाद आणि इस्लामोफोबिया पसरवण्यात हातभार लावणाऱ्या संघटनांबरोबर जानी असतात, असा आरोप झाला. त्यांना बायडेन यांच्या प्रचारातून दूर ठेवण्याची मागणी झाली. बायडेन यांनी पुरेशी काळजी घेत जानी यांच्यावरचा फोकस कमी केला.

जानींचे वडील सुरेश जानी यांनी Overseas Friends of the BJP (OFBJP) नावाची संस्था अमेरिकेत स्थापन केलीय. मोदी 1990 च्या सुमारास पहिल्यांदा अमेरिकेत गेले, तेव्हा सुरेश जानींनी त्यांचं केनेडी विमानतळावर स्वागत केले होते , हे विशेष .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER