५०० मुसलमानांसाठी श्री माता वैष्णवदेवी संस्थान करते शेरी आणि इफ्तारची व्यवस्था

Amid Ramazan, Vaishno Devi Shrine prepares sehri, iftari for 500 quarantined Muslims

कटरा : रमजानच्या महिन्यात विलगीकरणात असलेल्या ५०० मुसलमानांसाठी श्री माता वैष्णवदेवी संस्थान शेरी आणि इफ्तारची व्यवस्था करते आहे. कोरोनाच्या साथीत संस्थानने त्यांचे ‘आशीर्वाद भवन’ विलगीकरण केंद्रासाठी दिले आहे.

याबाबत माहिती देताना संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेशकुमार म्हणाले की, मार्चपासून आम्ही हे केंद्र सुरू केले आहे. या केंद्रात बहुसंख्य मजूर आहेत. ते रमजानचे रोजे ठेवतात. आम्ही त्यांच्या शेरी आणि इफ्तारची व्यवस्था करतो. आमच्या येथील केंद्राशिवाय इतर केंद्रांसाठीही आम्ही शेरी आणि इफ्तारची व्यवस्था करतो.

ही बातमी पण वाचा:- रमजान ईद दरवर्षी 11 दिवसांनी मागे जाते ; मुस्लीम चांद्र कॅलेंडरने सांगितले कारण

श्री माता वैष्णवदेवी हे हिंदूंच्या मुख्य श्रद्धास्थानांपैकी एक आहे. हे तिरुपतीनंतरचे सर्वांत श्रीमंत देवस्थान आहे. देवस्थानने २० मार्चपासून वेगवेगळ्या विलगीकरण केंद्रांना अन्न पुरवण्यासाठी ८० लाख रुपये व कोरोनाच्या उपचारासाठी सुमारे १.५ कोटी रुपये खर्च केले आहेत. कटरा येथील संस्थानच्या ‘आशीर्वाद भवन’ येथे भक्तांसाठी निवास व भोजनाची व्यवस्था आहे. येथील व्यवस्था इतकी स्वच्छ आणि व्यवस्थित आहे की, यात्रेकरू येथे हॉटेलमध्ये न थांबता ‘आशीर्वाद भवन’मध्ये मुक्काम करण्याला प्राधान्य देतात.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER