संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून

COVID-19 Pandemic Parliament Monsoon Session

मुंबई : कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. पावसाळी अधिवेशनाचे कामकाज शनिवार व रविवारसह सलग १८ दिवस होणार आहे. शेतमालाची आंतरराज्यीय विक्री, जीवनावश्यक वस्तू कायद्यातील दुरुस्ती आणि शेतमालाला दराची आगाऊ हमी या शेतीविषयक तीन विधेयकांसह बँकिंग नियमन दुरुस्ती अशी चार महत्त्वाची विधेयके मांडली जाणार आहेत. चारही विधेयकांना काँग्रेसने (Congress) विरोध करण्याचे ठरवले आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच एका सभागृहाच्या कामकाजासाठी दोन सभागृहं वापरली जाणार आहेत. म्हणजे लोकसभेचे कामकाज सुरु असताना लोकसभेचे खासदार राज्यसभेतही बसलेले आढळलेले आढळतील. या अधिवेशनात सरकार एकूण 23 विधेयकं सादर करणार आहे. त्यापैकी 11 हे अध्यादेश आहेत. कोरोना लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात सरकारनं काही निर्णय लागू करण्यासाठी अध्यादेश काढले होते. जसं की कोरोना वॉरियर्स, डॉक्टर, नर्सेस, आशा वर्कर्स यांच्यावर कुणी हल्ला केल्यास त्याला अधिक कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भारत-चीन यांच्यातील सध्याच्या घडामोडींवर विरोधकांनी चर्चेची मागणी केली असून, केंद्र सरकारकडून संसदेच्या दोन्ही सभागृहांत निवेदन दिले जाण्याची शक्यता आहे. तसेच तातडीची विधेयकेही संसदेत मांडली जातील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER