…तर कानाखाली आवाज काढेन ; आदित्यच्या ‘त्या’ वक्तव्यावर मनसेच्या नेत्याचा संताप अनावर

मुंबई : इंडियन आयडलमध्ये (Indian Idol) होस्टचं काम करणाऱ्या आदित्य नारायण (Aditya Narayan) याचा एक वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यानं अलिबागवरुन एका बॅकस्टेज आर्टिस्टला टोला लगावला. मात्र यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) संतापले आहेत. यापुढे अलिबागबद्दल असे काहीही म्हणशील तर तुझ्या कानाखाली आवाज काढेन असा रोखठोक इशारा त्यांनी दिला आहे.

अमेय खोपकर यांनी एका फेसबुक व्हिडीओच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे .

मी आदित्य नारायणचा एक व्हिडीओ पाहिला. या व्हिडीओमध्ये तो एका व्यक्तीवर संतापला अन् म्हणाला मी काय अलिबागवरुन आलोय का? त्याचं हे बोलणं आम्हाला खटकलं आहे. आलिबागची लोकं तुम्हाला इतकी मुर्ख वाटतात का? त्यानं आत्ताच्या आत्ता याबाबत माफी मागावी. मी त्याच्या वडिलांसोबतही बोललो आहे. अन् जर त्यानं माफी मागितली नाही. तर त्याच्या कानाखाली आवाज काढून परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आणून दिलं जाईल. यापुढे जर अलिबागबद्दल अशी आक्षेपार्ह वक्तव्य केली गेली तर तिथं तुमचं एकही चित्रीकरण करु दिलं जाणार नाही. यापुढे इशारा अमेय खोपकर यांनी आदित्य नारायणला दिला.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button