‘कोणाचा बँड वाजतो तर कोणाचा ब्रँड… ; ‘ठाकरे’ब्रँड वरून मनसेची पुन्हा टीका

Raj Thackeray - CM Uddhav Thackeray

मुंबई : “महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा (Thackeray Brand) जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल. ” अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना साद घातली आहे . मात्र, राऊत यांच्या या भूमिकेवर मनसे नेत्यांनी टीकास्त्र सोडले आहे . यावरून आज पुन्हा मनसेने शिवसेनेवर निशाणा साधला आहे .

विचार,संयम’ स्वाभिमान या मुळे “ब्रॅण्ड”मजबूत होत असतो. या उलट तडजोड, लाचारी यामुळे व्यवसाय तर होतो पण ब्रॅण्ड रसातळाला जातो’ अशा शब्दात संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ट्वीट करत शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना खोचक टोला लगावला आहे.

तसेच ‘कोणी घरी बसतो, कोणी उरी बसतो, कोणाचा बॅंड वाजतो, कोणाचा ब्रॅंड गाजतो!’ असं ट्वीट मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी केले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER