अमेरिकन नागरिकाची राष्ट्राध्यक्षपदासाठी ड्वेन जॉन्सनला पसंती

dwayne johnson - Maharastra Today
dwayne johnson - Maharastra Today

अमेरिकन नागरिकांचे काहीही सांगता येत नाही. प्रख्यात उद्योगपती डोनाल्ड ट्रम्प यांना निवडून दिल्यानंतर त्यांनी यावेळी डोनाल्ड ट्रम्पला (Donald Trump) घरी बसवले. नवीन राष्ट्राध्यक्ष येऊन सहा महिनेही झाले नाहीत तोवर अमेरिकेत नव्या राष्ट्राध्यक्षांसाठी एक सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेत कलाकारांच्या नावांचा समावेश होता. अमेरिकन नागरिकांनी डब्ल्यूडब्ल्यूई कुस्ती प्रकारातील अत्यंक लोकप्रिय ड्वेन जॉनसन (Dwayne Johnson) उर्फ ‘द रॉक’ (The Rock) ला पहिली पसंती दिली आहे. तर अँजेलिना जोली (Angelina Jolie) दुसऱ्या आणि ओप्रा विन्फ्रे (Oprah Winfrey) तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर प्रख्यात अभिनेता टॉम हँक्सला (Tom Hanks) २२ टक्के लोकांनी पसंती दिली

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्यासाठी ड्वेन जॉन्सनने प्रचार केला होता. त्यावेळी तो राजकारणात प्रवेश करणार असे म्हटले जात होते. याबाबत त्यावेळी पत्रकारांनी त्याला विचारले असता त्याने सांगितले, राजकारणात येण्याचा विचार नाही. पण भविष्यातील काही सांगता येत नाही. राजकारणात येऊही शकेन असे म्हटले होते. आता अमेरिकेत नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण अमेरिकेचा पुढील राष्ट्राध्यक्ष म्हणून तुम्ही कोणाला पाहू इच्छिता असा होता. या सर्वेक्षणानुसार अमेरिकेतील ४६ टक्के नागरिकांनी ड्वेन जॉन्सनला राष्ट्राध्यक्षपदासाठी पसंती दिली असून अँजेलिना जोलीला ३० टक्के तर ओप्रा विन्फ्रेला २७ टक्के नागरिकांनी पसंती दिली आहे.

या सर्वेक्षणानंतर सोशल मीडियावर (Social Media) प्रतिक्रिया देताना ड्वेन जॉन्सनने म्हटले आहे, “मला वाटत नाही की, आमच्या पूर्वजांनी कधीही असा विचार केला नसेल की, एक ६ फुटाचा टकला माणूस, ज्याचे अंग टॅटूने भरलेले आहे, जो टकीला पितो तो कधी अशा पदावर येऊ शकतो. पण भविष्यात जर असे झाले तर मला खरंच अभिमान वाटेल. तुमच्या सगळ्यांची सेवा करायला मला आवडेल. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला असून सगळे त्याच्या राजकारण प्रवेशाची वाट पाहू लागले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button