अमेरिकेने एकादशीच्या दिवशी चांद्रयान सोडल्याने त्यांची मोहिम यशस्वी: संभाजी भिडे

bhide-sambhaji

सोलापूर :- भारतीय काममापन पद्धतीला जगात तोड नाही. अमेरिकेने याच कालमापन पद्धतीचा उपयोग करत एकादिवशीच्या दिवशी चांद्रयान सोडल्यानेत त्यांची चांद्रमोहिम यशस्वी झाल्याचे वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले आहे.

भारतीय कालमापन पद्धतीला जगात तोड नाही. एक सेकंदाचा हजारावा भाग मोजण्याची पद्धतही भारतीय कालमापन पद्धतीत आहे असे संभाजी भिडे यांनी म्हटले आहे. अमेरिकेने याच कालमापन पद्धतीचा उपयोग केला म्हणूनच अमेरिकेची चांद्रयान मोहीम यशस्वी झाली असल्याचे संभाजी भिडे यांनी सोलापुरात म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : गूडन्यूज! विक्रम लँडर पूर्णपणे सुरक्षित