अंबानी कुटुंबीयांनी मानले मुंबई पोलिसांचे आभार, म्हणालेत …

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अ‌ॅन्टिलिया’ निवास्थानाजवळच गुरुवारी रात्री स्फोटक असलेली स्कार्पिओ कार आढळल्याने मुंबईमध्ये खळबळ उडाली. गाडीमध्ये जिलेटिन स्फोटकांच्या कांड्या होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) ज्या वेगाने कारवाई केली त्यासाठी अंबानी परिवाराने (Ambani family) पोलिसांचे आभार मानले.

या संदर्भात अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने एक पत्रक जारी केले. त्यात म्हटले आहे की, मुंबई पोलिसांनी तातडीने आणि जलद गतीने केलेल्या कारवाईबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आम्हाला विश्वास आहे की, या प्रकरणामध्ये पोलीस लवकरच वेगाने त्यांचा तपास पूर्ण करतील.

मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलिसांची १० पथके तयार करण्यात आली आहेत. या संदर्भात उल्लेखनीय आहे की, इंडियन मुजाहिद्दीनच्या एका हस्तकाने २०१३ मध्ये अंबानींच्या मरीन ड्राइव्हमधील कार्यालयात धमकीचे पत्र पाठवले होते. पत्रामध्ये अंबानी कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. याचा सध्याच्या प्रकरणाशी काही संबंध आहे का, यासंदर्भातील पोलीस तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER