शासनादेश आल्यानंतरच अंबाबाईचे मंदिर होणार दर्शनासाठी खुले

ambabai temple kolhapur

कोल्हापूर :  मंदिर खुले करण्याबाबत राज्य शासनाच्या स्पष्ट आदेश आल्यानंतरच करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर (Ambabai temple ) भाविकांसाठी उघडले जाणार आहे. असे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव (Mahesh Jadhav) यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीच्या सदस्य मंडळाची प्राथमिक बैठक झाली.

कोरोनाच्या जागतिक संकटामुळे लॉकडाऊनच्या (Lockdown) कालावधीपासून सुमारे सहा महिने राज्यातील सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद आहेत. लॉकडाऊन उठल्यानंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून टप्प्याने अनेक क्षेत्रे खुले केली जात आहेत. याच धर्तीवर राज्य शासनाने धार्मिक स्थळेही दर्शनासाठी खुली करावीत, अशी मागणी लोकांकडून केली जात आहे. राज्य शासनाने मंदिरे खुले करण्याचे संकेत काही दिवसांपूर्वी दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे मंदिर खुले होणार का, अशी विचारणा भाविकांकडून सातत्याने होत असल्याने देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी राज्य शासनाच्या आदेशाशिवाय मंदिर खुले होणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच मंदिर खुले करण्याचा आदेश झालाच तर सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागतील यासह दीड महिन्यावर आलेल्या नवरात्रौत्सवाबाबत समितीच्या प्राथमिक बैठकीत चर्चा करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER