अंबाबाईचे मंदिर विद्युत रोषणाईने निघाले उजळून

Ambabai Temple Kolhapur

कोल्हापूर : शारदीय नवरात्र (Navratri) उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे मंदिर (Ambabai Temple) अंतर्बाह्य विद्युत रोषणाईने उजळून निघाले. यंदा मंदिरात भाविकांना प्रवेश नसल्याने गणपती चौक ते गाभाऱ्यापर्यंत विविध रंगांची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नवरात्रौत्सवाची तयारी झाली आहे.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितिने मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक सोहळ्याची तयारी केली आहे. मंदिराची रंगरंगोटी, स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर आता अंतर्गत भागात वेगवेगळ्या रंगांची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

यावर्षी मंदिरात भाविकांना प्रवेश नसल्याने ही रोषणाई केली असून, त्यामुळे मंदिराचे सौंदर्य अधिक खुलले आहे. यंदा मंदिराबाहेर मांडव घालण्यात आलेला नाही. मात्र, देवस्थान समितीच्या कार्यालयाबाहेर छोटा मांडव सजला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER