नवरात्रौत्सवात अंबाबाईचे ऑनलाईन दर्शन

Ambabai's online darshan at Navratri

कोल्हापूर :- कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर करवीरनिवासिनी अंबाबाई देवी मंदिर नवरात्रौत्सवातही बंदच राहणार आहेत. दरम्यान, भाविकांना शारदीय नवरात्रोत्सव काळातील देवीच्या विविध रूपातील पूजेचे भाविकांना दर्शन व्हावे, यासाठी ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीसह मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात येणार आहे.

यंदा बंद मंदिरात नवरात्र उत्सव व दसऱ्याचे विधी गर्दी टाळून आणि सुरक्षिततेचे नियम पाळून पालखी सोहळ्यासह विविध प्रथा प्रतीकात्मक पद्धतीने होणार आहेत. यावेळी मोजक्या लोकांची उपस्थिती असेल. हे सर्व विधी सोहळा भाविकांना पाहता यावे यासाठी ठिकठिकाणी एलईडी स्क्रीन लावले जाणार आहेत. याशिवाय नवरात्रीतील दरोजच्या पूजा सोशल मीडिया, टीव्ही चैनल्स व ऑनलाईन पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER