अंबाबाई मंदिर बंदच : उद्यापासून विधिवत नवरात्रोत्सव

Ambabai temple closed

कोल्हापूर :  उद्या शनिवारपासून सुरू होणाऱ्या निवासिनी श्री अंबाबाई मंदिर नवरात्रोत्सवात (Shri Ambabai Mandir in Navratri festival)भाविकांना दर्शनासाठी बंदच राहणार आहे. मात्र, उत्सवातील सर्व पारंपरिक
विधी मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत होणार आहेत. उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व तयारी पूर्ण झाली असून, मंदिर परिसरात रोषणाई करण्यात आली आहे.

शनिवारी (ता. 17) सकाळी नऊच्या सुमारास तोफेची सलामी दिल्यावर मंदिरात घटस्थापना होऊन उत्सवाला प्रारंभ होईल. रोज दुपारी देवीची विविध रूपांत सालंकृत पूजा बांधली जाईल. ललिता पंचमीला टेंबलाई टेकडी, अष्टमीला नगरप्रदक्षिणा आणि शाही दसऱ्यासाठी यंदा सजविलेल्या वाहनांतून देवीची उत्सवमूर्ती जाणार आहे. गर्दी टाळण्यासाठी ही खबरदारी घेतली जाणार असून, उत्सवातील हे तिन्ही धार्मिक विधी मोजक्‍याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहेत.एका तिथीचा क्षय झाल्याने यंदा खंडेनवमी आणि दसरा एकाच दिवशी साजरा होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER