अंबाबाई किरणोत्सव : आज किरणोत्सवाचा पाचवा दिवस

Ammbabai

कोल्हापूर : किरणोत्सवाच्या पाचव्या दिवशी श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये किरणे पूर्ण क्षमतेने देवीच्या मुखापर्यंत पोहोचली. त्यामुळे आज किरणोत्सव पूर्ण झाला. आज प्रथम किरणे कठांजनाजवळ ५.४३ मिनिटांनी पोहोचली. त्यानंतर किरणांनी ५.४४ मिनिटांनी चरणांना स्पर्श केला. पुढे ५.४५ मिनिटांनी ही किरणे कंबरेपर्यंत पोहोचली. त्यानंतर ५.४६ मिनिटांनी छातीपर्यंत किरणे पोहोचली. पुढे ५.४७ मिनिटांनी गळ्यापर्यंत ही किरणे पोहोचली. त्यानंतर ५.४८ मिनिटांनी ही सोनेरी किरणे चेहऱ्यावरून मळवटापर्यंत पोहोचली. पुढे ५.४९ला किरीटाकडून ही किरणे लुप्त झाली. अशा प्रकारे आजचा किरणोत्सव झाला.

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात रविवार (दि. ८)पासून किरणोत्सव सोहळ्याला प्रारंभ झाला होता. पहिल्या दिवशी प्रखर किरणांनी चरणांना स्पर्श करत पायापर्यंत पोहोचली. दुसऱ्या, तिसऱ्या दिवशीही किरणे मूर्तीच्या कंबर पोहोचली. चौथ्या दिवशी किरणोत्सवाच्या मालिकेनुसार किरणे मूर्तीच्या मुखावर पडतात अशी परंपरा आहे. यंदाच्या वर्षी कायम राहिली.

सुवर्णालंकारभूषित श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अर्थात अंबाबाई. आजच्या किरणोत्सव सोहळ्यामध्ये सूर्यनारायणाच्या सोनेरी किरणांच्या अभिषेकामध्ये न्हाऊन निघाली. दीपावलीच्या पूर्वसंध्येला देवीचे हे रूप विलोभनीय असे होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER