करवीरनिवासिनी अंबाबाई किरणोत्सव : सुर्यकिरणे मूर्तीच्या गळयापर्यंत

Ambabai Temple Kolhapur

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या किरणोत्सव (Ambabai Kiran Utsav) सोहळयाच्या तिसऱ्या दिवशी सुर्याची किरणे मूर्तीच्या गळयापर्यंत पोहचली. रविवार हा किरणोत्सवाचा तिसरा दिवस होता. सुर्यकिरणांनी सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी देवीचे चरण स्पर्श केले. यानंतर हळू-हळू सुर्यकिरणे वर सरकत सहा वाजून १८ मिनिटापर्यंत देवीच्या मूर्तीच्या गळयापर्यंत पोहचली.यानंतर सुर्यकिरणांची तीव्रता कमी कमी होत ती दक्षिणेकडे लुप्त झाली. किरणोत्सव झाल्यामुळे मंदिरात आरती करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER