अंबाबाई दर्शन वेळ दोन तासांनी वाढवली

Ambabai Temple Kolhapur

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडील करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई (Ambabai Temple) ,केदारलिंग (जोतिबा), ओढ्यवरील सिध्दीविनायक मंदिर, दत्त भिक्षालिंग सह तीनहजार बेचाळीस मंदिरातील दर्शन वेळेत वाढ करण्याचा निर्णय आज देवस्थान समितीचे मुख्य कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

दर्शनाची वेळ सकाळी ९ ते दुपारी १२ होती. ती आता सकाळी ७ ते दुपारी १२ तर सायंकाळी ४ ते ७ करण्यात आली आहे. तसेच दर्शन आता ई पासद्वारे घेता येणार असून यासाठी देवस्थान समितीचे ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरावा लागेल. फॉर्म भरल्यानंतर ई पास तयार होईल. या भक्तांसाठी वेगळी रांग करण्यात येणार असून हि सुविधा संपूर्ण मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे, आशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री महेश जाधव यांनी दिली. यावेळी सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार अभियंता देशपांडे उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER