मनसेसमोर ‘अ‍ॅमेझॉन’ची माघार; मनसे सैनिकांविरुद्धचा खटला घेतला मागे?

Raj Thackeray & Amazon

मुंबई :- मराठीबाबतच्या मनसेच्या आक्रमकतेपुढे अ‍ॅमेझॉनने नरमाईची भूमिका घेतली आहे. अ‍ॅमेझॉनच्या अ‍ॅपमध्ये मराठीचा समावेश केल्यानंतर मनसे (MNS) सैनिकांविरोधातील खटला मागे घेतला आहे. याबाबतचे पत्र अ‍ॅमेझॉनने (Amazon) दिंडोशी कोर्टाला दिले आहे. (amazon take back notice against mns chief Raj Thackeray and party workers)

अ‍ॅमेझॉनच्या अ‍ॅपवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरू केलेल्या मोहिमेत वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी आणि रेक्लमेशनच्या परिसरातील रस्त्यांवर अ‍ॅमेझॉनविरोधात ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’चे फलक लावण्यात आले होते.

मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी हे फलक लावले होते. यापूर्वी मनसेकडून अ‍ॅमेझॉनच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर पोस्टर झळकावण्यात इशारा देण्यात आला होता. तुम्हाला महाराष्ट्रात आमची भाषा मान्य नाही. मग आम्हाला महाराष्ट्रात तुम्ही मान्य नाही, अशी तंबी मनसेने दिली होती. काही दिवसांपूर्वीच ‘अ‍ॅमेझॉन’ आणि ‘फ्लिपकार्ट’ या ऑनलाईन शॉपिंग अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याच्या मागणीसाठी मनसेने या कंपन्यांच्या ऑफिसवर धडक दिली होती. सात दिवसांत मराठी भाषेचा पर्याय न ठेवल्यास स्टाफला लाथ मारून बाहेर काढण्याची धमकीही मनसेने दिली होती.

या प्रकरणी अ‍ॅमेझॉनने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उपविभागप्रमुख अखिल चित्रे (Akhil Chitre) यांच्याविरोधात न्यायालयात प्रतिबंधात्मक दावा केला होता. आज या खटल्यावर सुनावणी होणार होती. संबंधितांना कोर्टात हजर राहावे लागणार होते. परंतु, अ‍ॅमेझॉनच्या वकिलांनी दिंडोशी कोर्टाला पत्र देऊन दावा मागे घेत असल्याचे सांगितले.

ही बातमी पण वाचा : पोलिसांना मनसेचे आव्हान; वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग दाखवू …

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER