अमेझॉनची सर्वोच्च न्यायालयात धाव

Amazon - Supreme Court

नवी दिल्ली : फ्युचर समूह आणि रिलायन्स इंडस्ट्रीज दरम्यान झालेल्या व्यवहाराला अमेझॉन कंपनीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या व्यवहाराला सदस्यीय खंडपीठाने स्थगिती दिली होती. याबाबत अमेझॉन कंपनीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. स्पर्धा आयोग व बाजार नियंत्रक सेबीच्या अटी आणि शर्तीकडे दुर्लक्ष करून निर्णय घेतला आहे, असे अमेझॉन कंपनीचे म्हणणे आहे.

मागील ऑक्‍टोबर महिन्यात अमेझॉन कंपनीने सिंगापूर येथील लवादात याचिका दाखल केली होती. लवादाने अमेझॉनच्या बाजूने निर्णय दिलेला आहे. अमेझॉन किंवा फ्युचर रिटेल कंपनीने यासंदर्भात वृत्त माध्यमांना माहिती दिली नाही. या व्यवहाराची अमेझॉनला कल्पना होती. मात्र अमेझॉनने त्याकडे दुर्लक्ष केले. आर्थिक अडचणींमुळे फ्युचर रिटेल कंपनीला रिलायन्स इंडस्ट्रीज बरोबर व्यवहार करावा लागला, असे फ्युचर रिटेल कंपनीचे म्हणणे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER