अखेर मनसेच्या मागणीची अ‍ॅमेझॉनकडून दखल, अ‍ॅपमध्ये मराठीचा समावेश होणार

Amazon-MNS

मुंबई : नवरात्रीच्या (Navratri) मुहूर्तावर फ्लिपकार्ट (Flipkart) आणि अ‍ॅमेझॉनसारख्या शॉपिंग साईट्सने ऑनलाईन खरेदीवर मोठ्या ऑफर सुरू केल्या आहेत. इंग्रजी, हिंदी आणि दक्षिणेतील काही भाषांसह हे अ‍ॅप भारतात काम करतात. पण, या अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश नसल्याने मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. अ‍ॅमेझॉन (Amazon), फ्लिपकार्ट यांनी येत्या सात दिवसांत त्यांचं अ‍ॅप मराठी भाषेत (Marathi Language App) सुरू करावं, अन्यथा त्यांची दिवाळी मनसे स्टाईलने होईल, असा इशारा मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी दिला होता. मात्र आता मनसेच्या मागणीची दखल अ‍ॅमेझॉनने घेतली आहे.

अखिल चित्रे यांनी अ‍ॅमेझॉनला मराठी भाषेच्या वापरासंदर्भात ई-मेल पाठवला होता. अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांच्या वतीने ‘अ‍ॅमेझॉन.इन’च्या जनसंपर्क विभागाने त्याला आता प्रतिसाद दिला आहे. बेजॉस यांना आपला मेल मिळाला आहे. अ‍ॅमेझॉन अ‍ॅपमधील त्रुटींमुळे आपल्याला जो मनस्ताप झाला, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित विभागाला तुमच्या तक्रारीबद्दल कळवण्यात आलं असून लवकरच त्यावर कार्यवाही केली जाईल, असं अ‍ॅमेझॉनने स्पष्ट केलं आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अखिल चित्रे यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. अ‍ॅमेझॉनच्या डिजिटल सेवेत (Trading App) मराठीला प्राधान्य देण्याच्या मनसेच्या आग्रही मागणीची अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या प्रतिनिधींनी घेतली दखल. अ‍ॅमेझॉनचं शिष्टमंडळ आज मुंबईत… राजसाहेब म्हणतात तसं… तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम असाल तर जग तुमची दखल घेतं, असं ट्विट अखिल यांनी केलं आहे.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरेंचा ड्रिम प्रोजेक्ट टवाळखोरांचा अड्डा ; बंदोबस्त करा अन्यथा खळ्ळखट्याक, मनसेचा इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER