अखेर अ‍ॅमेझॉन बॅकफूटवर, मागितली राज ठाकरेंची माफी

मुंबई : मराठीच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर अ‍ॅमेझॉन बॅकफूटवर आली आहे. अ‍ॅमेझॉनने आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करण्याचं आश्वासन दिलं असल्याची माहिती मनसे नेते अखिल चित्रे (Akhil Chitre) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. यासोबतच अ‍ॅमेझॉनकडून (Amazon) राज ठाकरेंची (Raj Thackeray) माफी मागितल्याची माहितीही चित्रे यांनी दिली.

ज्याप्रकारे त्यांनी आपल्या वेब पेजवर किंवा मोबाइल अ‍ॅपवर भाषा निवडताना मराठी लवकरच आणत आहोत आणि आपण क्षमस्व आहोत असं टाकलं आहे. मराठीद्वेष दाखवला तेव्हाच आम्ही मनसैनिक अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार असं सांगितलं होतं. त्याचप्रकारे शुक्रवारी काही फटाके फुटले आणि अ‍ॅमेझॉन प्रशासन खडबडून जागं झालं. राज ठाकरे, आमचे सचिव, पदाधिकारी यांना नोटीस पाठवल्यानंतर माफी मागावी अशी आमची पहिली अट होती. त्यानुसार त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. ५ तारखेला सर्व केसेस ते रद्द करणार आहेत, अशी माहिती चित्रे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER