पर्यटनस्थळ असलेल्या या स्मशानभूमी बद्दल तुम्हाला माहिती आहे काय ?

waranasi

पर्यटनस्थळ म्हंटले की आपल्या समोर येतो निलाक्षार समुद्र, हिरवेगार जंगल, हिमालयाच्या रांगा किंवा एखादे सर्गरम्य ठिकाण. परंतु हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल की भारतात एक असे ठिकाण आहे जिथे स्मशानभूमी पाहायला देश विदेशातून पर्यटक गर्दी करीत असतात. या स्मशानभूमीच्या चक्क पर्यटन स्थळाइतके महत्व आहे. ही स्मशानभूमी आहे काशीची असे म्हणतात की आयुष्यात एकदा का होईना काशी विश्‍वेश्‍वराचे दर्शन घ्यावे आणि गंगेत डुबकी मारावी. जगभरातून अनेक हिंदू लोक येथे काशी विश्‍वेश्‍वराच्या दर्शनाला येतात. अभ्यास आणि पर्यटनाचा भाग म्हणून देखील अनेक विदेशी पर्यटक काशीला आवर्जून भेट देतात. काशीला जर भेट दिली तर काही गोष्टी आवर्जून बघाव्यात आणि त्या म्हणजे काशी विश्‍वेश्‍वराचे दर्शन, बनारसी साडी, गंगेची आरती, गंगेच्याकाठी बांधलेले प्रसिद्ध घाट.

ही बातमी पण वाचा : काशी और मथुरा पर भी दावा छोड़ें मुस्लिम संगठन : सुब्रमण्यम स्वामी

गंगेच्या काठी एकूण ८५ घाट आहेत. एखाद्या नावेत बसून जर तुम्ही गंगा नदीतून सैर केली तर तुम्हाला या सर्व घाटांचे दर्शन होते. या ८५ घाटांपैकी काही प्रसिद्ध घाट म्हणजे दशाश्‍वमेध घाट, असी घाट, दरभंगा घाट, मनमंदिर घाट, अहिल्याबाई होळकर घाट, मणिकर्णिका घाट! या घाटांमध्ये सर्वात जुना घाट म्हणजे मणिकर्णिका घाट. हा घाट ३००० वर्षांपेक्षाही जुना आहे आणि या घाटाबद्दल अनेक दैवी कथा सांगितल्या जातात. गंगेवर नावेत बसून जर तुम्ही घाटांचे दर्शन घेत असाल तर या यात्रेला पंचक्रोशीची यात्रा म्हणतात आणि या यात्रेत जर तुम्हाला मणिकर्णिका घाटाचे दर्शन होत नसेल तर यात्रा पूर्ण होत नाही असे म्हणतात. मुळात मणिकर्णिका घाट ही एक स्मशानभूमी आहे; पण स्मशानभूमी असूनदेखील या घाटाचे खूप मोठे महत्त्व आहे. विदेशी पर्यटकांसाठी हा घाट एक स्मशानभूमी असूनदेखील पर्यटनाचे केंद्रबिंदू बनला आहे. पर्यटन केंद्रबिंदू बनायचे कारण म्हणजे ही भारतातील एकमेव अशी स्मशानभूमी आहे जिथे अखंडपणे अंतिम संस्कार सुरु असतात. एका आकडेवारीनुसार या स्मशानभूमीत एका दिवसाला साधारणपणे २५० ते ३००  देहांचे अंतिमसंस्कार होतात. या कारणामुळे या घाटाला महास्मशानभूमी असे देखील म्हणतात.

ही बातमी पण वाचा : या ठिकाणी घ्या गुलाबी थंडीचा आनंद