साउथी आणि बोल्टचा विलक्षण योगायोग

Tim Southee - Trent Boult

न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाने पूर्ण केलेल्या कसोटी विजयांच्या शतकानिमीत्ताने एक अनोखा योगायोग समोर आला आहे. न्यूझीलंडचे प्रमुख जलद गोलंदाज टीम साउथी व ट्रेंट बोल्ट यांच्याबद्दलचा हा योगायोग आहे. न्यूझीलंडच्या 100 विजयी कसोटी सामन्यांपैकी या दोघांनी सारखेच प्रत्येकी 30 सामने खेळले आहेत.

न्यूझीलंडची विजयांची सेंच्युरी सर्वात ‘संथ’

या 30 सामन्यात साउथीच्या नावावर बळी आहेत 147 आणि ट्रेंट बोल्टच्या नावावर 146. सरासरी अनुक्रमे 21.91 व 21.49. सारे काही जवळपास सारखेच. विशेष म्हणजे डावात पाच किंवा अधिक बळी मिळविण्याची कामगिरीसुध्दा दोघांनी प्रत्येकी चार वेळा केली आहे.

न्यूझीलंडच्या शंभराव्या विजयातही हे दोघेच चमकले. साऊथीने नऊ आणि बोल्टने पाच बळी या सामन्यात कमावले.