हालेप- अनिसीमोव्हा -स्वायटेक आणि निकालांचा विलक्षण योगायोग

एक वर्षात किती मोठी उलथापालथ घडून येऊ शकते हे महिला टेनिसपटू सिमोना हालेप (Simona Helep) व इगा स्वियाटेक (Iga Swiatek) यांना कळुन चुकलेय. गेल्या वर्षीची फ्रेंच ओपन आणि यंदाची फ्रेंच ओपन (French Open) यातील यांच्या सामन्यांचे निकाल पाहिले तर आदल्या वर्षीच्या अगदी उलट निकाल आहेत. या दोघींमध्ये आणखी एक खेळाडू अमेरिकेची अमांडा अनिसीमोव्हा (Amanda Anisimova) ही जर जोडली तर एक कमालीचा विलक्षण योगयोग तुम्हाला दिसुन येईल जो कळल्यावर तुम्हीसुध्दा थक्क व्हाल.

2019 च्या फ्रेंच ओपनमध्ये इगा स्वायटेकचा 6-1, 6-0 असा धुव्वा उडवत सिमोना हालेप क्वार्टरफायनलमध्ये पोहोचली होती, मात्र क्वार्टर फायनलमध्ये तिला अमांडा अनिसिमोव्हा हिने 2-6, 4-6 असा पराभवाचा धक्का दिला होता.

लक्षात घ्या 2019 मध्ये सिमोना हालेपने आधी स्वायटेकला हरवले होते आणि नंतरच्या सामन्यात ती अनिसीमोव्हाकडून हरली होता. आता यंदाचे सामने पहाल तर निकाल याच्या अगदी उलट आहे. यंदा सिमोना हालेपने आधीच्या सामन्यात अनिसीमोव्हाला हरवले तर नंतरच्या सामन्यात ती स्वायटेककडून पराभूत झाली.

यंदा तिसऱ्या फेरीत हालेप-अनिसिमोव्हा सामना झाला त्यात हालेप 6-0, 6-1 अशी जिंकली. योगायोग पहा गेल्यावर्षि याच फरकाने तिला स्वायटेकला हरवले होते.आता यंदा अनिसिमोव्हाला हरवल्यावर हालेपचा पुढचा सामना इगा स्वायटेकशी झाला आणि स्वायटेकने तो 6-1, 6-2 असा जिंकून गेल्यवर्षीचा हिशेब चुकता केला. मात्र या सामन्यांनी व निकालांनी एकाच वर्षात निकालांचा किती उलटफेर होऊ शकतो हे दाखवून दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER