नवज्योतसिंग सिद्धूंना मंत्रिमंडळात स्थान, पण उपमुख्यमंत्रीपद मिळणार नाही : अमरिंदर सिंग

Amarinder Singh-Navjot Singh Sidhu

चंदीगड : काँग्रेसचे (Congress) नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांच्यासह पक्षाचे काही आमदार आणि मंत्र्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh) यांच्या विरोधात बंड पुकारले आहे. सिद्धूंना मंत्रिमंडळात स्थान असेल, पण उपमुख्यमंत्रीपद मिळणार नाही. शिवाय प्रदेशाध्यक्षपदही देणार नाही, असे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या तीन सदस्यीय समितीने अमरिंदर सिंग यांच्याविरोधात आमदार आणि मंत्र्यांच्या तक्रारी ऐकल्या. त्यानंतर त्यांचेही म्हणणेही ऐकून घेतले. यावेळी त्यांनी सिद्धूंना उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदही देणार नसल्याचे समितीसमोर स्पष्ट केले. सिद्धूंकडे ही पदे दिल्यास राज्यातील समीकरणे बिघडू शकते आणि पक्षाला निवडणुकीत नुकसानही होऊ शकते, असे सिंग यांचे म्हणणे असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, सिंग यांनी सिद्धूंना मंत्रिमंडळात सहभागी करण्याचे मान्य केले आहे. सिद्धूंसाठी पद रिक्त असून त्यांना मंत्रिमंडळात घेता येईल. सिद्धूंकडे पक्षाध्यक्षपद देता येणे योग्य नाही, असे सिंग यांनी स्पष्ट केले आहे. सिंह यांनी समितीला सिद्धू आणि प्रतापसिंह बाजवा यांच्यासारख्या नेत्यांना समज देण्यास सूत्रांनी सांगितले.

शीख व्यक्ती नको

उपमुख्यमंत्रीपद किंवा प्रदेशाध्यक्षपद शीख समाजाचा व्यक्ती नको. कारण मुख्यमंत्रीपदीच शीख व्यक्ती आहे. महत्त्वाचे पद शीख व्यक्तीला दिल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल, असे सिंग यांनी समितीसमोर स्पष्ट केले. तसेच सिद्धू सरकारविरोधी काम करत असून सातत्याने टीका करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

नेमकं वाद काय?

पंजाब काँग्रेस विभागली गेली आहे. त्यामुळे हायकमांडने या २५ आमदार आणि मंत्र्यांना दिल्लीत बोलावले. या आमदारांशी काँग्रेसच्या तीन सदस्यांच्या समितीने चर्चा केली. या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना काही सवाल केले. परिणामी, मुख्यमंत्री आणि या आमदारांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. तसेच बंडखोरांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील झाखड, मंत्री चरणजीत चन्नी, सुखजिंदर सिंह रंधावा आदींचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button