ऐश्वर्या रायची जुळी बहीण शोभेल ही पाकिस्तानी मुलगी

Amana Imran Pakistani girl just look like Aishwarya Rai

म्हणतात की, जगात एकाच चेहऱ्याची पाच ते सहा माणसे असतात. त्यामुळे कधी कधी एखाद्या व्यक्तीला आपण पाहिल्यानंतर त्याला कुठे तरी पाहिल्याचे आपल्याला जाणवते. खरे तर त्या व्यक्तीला आपण पाहिलेले नसते तर त्याच्यासारखा दिसणारा कोणी तरी आपल्याला कुठे तरी भेटलेला असतो किंवा आपला परिचित असतो. परंतु कधी कधी तर असे चेहरे इतके हुबेहूब असतात की त्यांना जुळे म्हणण्याचा मोह होतो.

बॉलिवूडमध्ये (Bollywood news) झरीन खानला कॅटरीना कैफची डुप्लिकेट म्हटले जाते तर स्नेहा उल्लालमध्येही ऐश्वर्या रायची झलक दिसत होती. विशेष म्हणजे या दोन्ही नायिकांना सलमान खाननेच बॉलिवूडमध्ये एंट्री दिली होती. आता ऐश्वर्याची (Aishwarya Rai) जुळी बहीण शोभेल अशी एक मुलगी समोर आली असून तिचा फोटो पाहून तुम्ही नक्कीच म्हणाल की, ही ऐश्वर्या रायच आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर ऐश्वर्या रायचे दोन फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून त्यावर फॅन्सच्या मनोरंजक प्रतिक्रियाही येत आहेत. हुबेहूब ऐश्वर्यासारखी दिसणारी ही मुलगी पाकिस्तानची असून तिचे नाव आमना इमरान (Amana Imran) आहे. या दोघींमधील साम्य पाहून सगळेच अवाक झालेले आहेत.

आमना इमरान सध्या अमेरिकेत राहात आहे. या दोघींच्या एकत्र फोटोवर एका युजरने लिहिले आहे, ‘पहिल्यांदा तर मला वाटले की, ही ऐश्वर्या राय बच्चनच आहे.’ तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे, ‘एका सेकंदासाठी मला वाटले की, ही ऐश्वर्या रायच आहे.’ एका युजरने तर आमनाने प्लॅस्टिक सर्जरी केली असल्याचे म्हटले आहे. तो म्हणतो, ‘मला वाटते की, ऐश्वर्या रायसारखे दिसण्यासाठी आमना इमरानने प्लॅस्टिक सर्जरीची मदत घेतली असावी.

प्लॅस्टिक सर्जरी करून तिने पूर्णपणे ऐश्वर्या रायसारखी दिसण्याचा प्रयत्न केला आहे.’ युजरच्या या पोस्टला उत्तर देताना आमनाने लिहिले आहे, ‘धन्यवाद. मी आपली आभारी आहे. आपण सगळ्यांनी दाखवलेल्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद. पण मी कोणतीही प्लॅस्टिक सर्जरी केलेली नाही. आमना ऐश्वर्यासारखी दिसत असली तरी यापूर्वी मराठी अभिनेत्री मानसी नाईकनेही ऐश्वर्या रायप्रमाणे दिसण्याचा प्रयत्न केला होता. तर अमृता नावाच्या एका मॉडेलनेही ऐश्वर्या रायसारखा मेकअप करून टिक-टॉक व्हिडीओ तयार केले होते जे प्रचंड लोकप्रिय होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER