मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडण्याचा सल्ला देणाऱ्या मनसेला शिवसेनेच्या ‘दादां’ नी सुनावले

Bala Nandgaonkar & Dada Bhuse

मुंबई : मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी एक व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना घराबाहेर पडून पडण्याचा सल्ला दिला होता. या विधानंतर आता राज्याचे कृषिमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दादा भुसे (Dada Bhuse) यांनी उत्तर दिले आहे.

भुसे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, मी राज्यभर दौरे करून शेतकऱ्यांच्या व्यथा व समस्या जाणून घेत आहे. तसेच एक ते दीड महिन्याच्या कालावधीत कृषी विभाग आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात मुख्यमंत्रांनी 6 वेळा बैठका घेतल्या आहेत, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली.

बाळा नांदगावकर ट्विट करत म्हणाले होते की, मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल “online” बघता येणार नाही. थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत दया, अन्यथा लोकांचा “ठाकरे”नावावरील विश्वास उडेल, असं बाळा नांदगावकर यांनी म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER