सदा सुखी राहा !’ लता मंगेशकर यांनी कोरोनासाठी झटणाऱ्या डॉक्टरला दिल्या शुभकामना

lata mangeshkar - Maharashtra Today

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) :- मुंबई येथे कोरोनाविरुद्धच्या युद्धात आघाडीवर असलेले डॉ. राजेश डेरे यांना पत्र लिहून ज्येष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांनी ‘सदा सुखी राहा !’ अशा भावपूर्ण शब्दांत शुभेच्छा दिल्या. मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकारातून वांद्रे-कुर्ला संकुलात २ हजार २०८ रुग्ण क्षमतेचे कोविड सेंटर आहे. त्या केंद्राचे प्रमुख आहेत रेणवडी (ता. पारनेर) येथील डॉ. राजेश डेरे. आतापर्यंत २२ हजार रुग्ण तेथे उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांच्या कार्याचे बॉलिवूडमधील (Bollywood) सेलिब्रेटी तसेच अनेक राजकीय नेत्यांनी कौतुक केले आहे.

या ठिकाणी लसीकरण कक्षही आहे. येथून २ लाख ३१ हजार २१४ नागरिकांना आतापर्यंत लस देण्यात आली. एकूण ३७८ डॉक्टर, ३९९ परिचारिका, ५१३ वार्ड बॉय तेथे काम करीत आहेत. डॉ. डेरे हे मुंबईमधील सात हजार रुग्ण क्षमतेच्या सात जम्बो कोविड सेंटरमध्येही समन्वयकाची भूमिका बजावत आहेत. या ठिकाणी अजून तीन कोविड सेंटरचे उभारणीचे काम सुरू आहे. शिर्डीमधील (Shirdi) नव्याने होत असलेले चार हजार रुग्ण क्षमतेच्या कोविड सेंटरमध्येही डॉ. डेरे मदत करत आहेत. राज्य सरकारकडून समन्वयकाची भूमिका बजावत आहेत. जागतिक सर्वेक्षणात मुंबईमधील कोविड सेंटरचे काम चांगल्या प्रकारे सुरू असल्याचे म्हटले आले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर, अभिनेता सचिन पिळगावकर यांच्यासह अनेक कलाकारांनी या कामाचे कौतुक केले आहे. लतादीदींच्या पत्रामुळे आम्हा सर्वच वैद्यकीय कर्मचा-यांना अधिक जोमाने रुग्णसेवा करण्याचे बळ मिळाले, असे डॉ. राजेश डेरे म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button