केंद्र सरकार दुजाभाव करत असेल तरी ‘राज्य’ मात्र खंबीर आहे; बच्चू कडूंचा केंद्राला टोला

Maharashtra Today

अहमदनगर : “पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांना जी जबाबदारी पार पाडायला हवी होती, ती त्यांनी योग्यरितीने पार पाडली नाही. यामुळे आज जी आपत्ती आहे ती देशासोबत राज्यावर येऊन पडली आहे. देशात जर योग्य नियोजन झाले असते, तर आज हे दिवस आपल्याला पाहायला मिळाले नसते.” असा शाब्दिक हल्लाबोल राज्यमंत्री बच्चू कडू(Bacchu kadu) यांनी मोदी सरकारवर केला.

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी १२ मी रोजी अहमदनगरला प्रहार कोविड सेंटरची पाहणी केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. त्याचबरोबर राज्यातील लसीच्या तुटवड्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे प्रमुख आहेत ते मोदींकडे गेले का? आम्हाला लसीकरण जास्त द्या किंवा इतर साहित्य द्या, असे एक तरी निवेदन त्यांनी पंतप्रधानांना दिले का? असा संतप्त सवाल बच्चू कडूंनी उपस्थित केला आहे. तसेच महाराष्ट्रात राहून सरकारवर टीका टिप्पणी करण्यापेक्षा ते केंद्रातून काय आणू शकले, याचे उदाहरण देवेंद्रजींनी द्यावे, मग त्यांना बोलायचा अधिकार आहे, असा टोलाही बच्चू कडू यांनी फडणवीसांना लगावला.

“केंद्राकडून जे काही मिळते त्यात दुजाभाव होतो. यावर आम्ही बोललो, पण कोणत्याही वादात पडलो नाही. आज देशात सर्वात चांगले व्यवस्थापन हे महाराष्ट्रात केले जात आहेत. तसेच मुंबईचे जागतिक पातळीवर कौतुक होत आहे. केंद्र सरकार दुजाभाव करत असेल, तरी राज्य मात्र खंबीर आहे. सध्या इतर राज्यापेक्षा आपली स्थिती बरी आहे.” असेही बच्चू कडू म्हणाले.

केंद्राने योग्य भूमिका बजावली नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मागील महिन्याचे स्टेटमेंट पाहिले तर देशातून कोरोना गेल्याचे ते बोलले होते. एक महिन्यानंतर कोरोना जगाच्या पाठीवर सर्वांत जास्त आपल्या देशात आहे. पंतप्रधान म्हणून जी भूमिका बजावायला पाहिजे, त्या त्यांनी बजावल्याच नाही. यामुळे आज जी आपत्ती आली आहे, ती देशासोबत राज्यवर येऊन पडली आहे. देशात जर नियोजन झाले असते, तर आज हे दिवस पाहायला मिळाले नसते, असे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button