आज मी तिथे नसलो तरी आपण सर्व एकत्र आहोत; मुख्यमंत्र्यांकडून बाळांच्या मातांचे सांत्वन

Uddhav Thackeray - Bhandara District Hospital Fire

मुंबई : भंडाऱ्यातील शासकीय सामान्य रुग्णालयात आग लागल्यामुळे १० नवजात बाळांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच आज मी तिथे नसलो तरी आपण सर्व एकत्र आहोत, असे म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भंडाऱ्यात घडलेल्या घटनेत मृत्यू झालेल्या बाळांच्या माता आणि नातेवाइकांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे .

भंडाऱ्यामध्ये जे घडले ते योग्य नाही. काल रात्री त्या घटनेबद्दल मला समजले. मी काल त्या भागात होतो, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला. काल गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी केली. तेव्हा तेथील  स्थानिकांची मागणी होती हा प्रकल्प लवकर पूर्ण करा. येथे पंजाबसारखी हरित क्रांती  होईल.

परंतु माझ्या मनात संमिश्र प्रतिक्रिया होती. आज पंजाबमधील शेतकरी आंदोलन करत आहेत. आपण शेतकऱ्यांसाठी हे सर्व करू; परंतु कायदे करून त्या सर्वांवर पाणी फिरू नये, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER