गुजरातमध्ये काँग्रेसला पर्याय राष्ट्रवादी, पवारांकडून हार्दिक पटेलला पक्षात घेण्याच्या हालचाली?

Alternatives to Congress in Gujarat NCP's move to get Hardik Patel from Pawar

मुंबई : गुजरातमधील प्रमुख महापालिकांच्या नुकत्याच निवडणुका झाल्या. त्यात भाजपचा मोठा विजय झाला आहे तर काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला आहे. या निकालांनंतर गुजरात काँग्रेसमध्ये कमालीची अस्वस्थता वाढली आहे. त्यात कार्याध्यक्ष असलेल्या हार्दिक पटेल (Hardik Patel ) यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. आणि अशातच गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष व पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी गुरूवारी मुंबईत सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)यांची भेट घेतल्याने गुजरातपासून मुंबईपर्यंत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. या भेटीतील चर्चेचा अधिकृत तपशील मिळाला नसला तरी गुजरातमधील सध्याची राजकीय स्थिती, पुढच्या वर्षी होणाऱ्या गुजरात विधानसभेच्या निवडणुका, आरक्षण हे मुद्दे चर्चेत होते, असे कळते.

गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर पटेल यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. या पार्श्वभूमीवर पटेल यांच्या पवार भेटीचे अनेक अर्थ काढले जात आहेत. काँग्रेसकडून माझ्या नेतृत्वाला गुजरातमध्ये योग्य संधी दिली गेली नाही. पालिका निवडणुकीत माझी एकही सभा घेतली गेली नाही आणि पक्षाच्या कोणत्याच प्रमुख नेत्याने मला प्रचारासाठी बोलावले नाही, अशा शब्दांत पटेल यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर पटेल यांनी घेतलेली शरद पवारांची भेट अधिक महत्त्वाची ठरली आहे. गुजरातमध्ये राष्ट्रवादीच्या विस्तारासाठी हार्दिक पटेल यांना पक्षात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत का?, हार्दिक पटेल काँग्रेसची साथ सोडून गुजरातेत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणार का?, असे प्रश्नही यानिमित्ताने चर्चिले जाऊ लागले आहेत. पवार यांच्या भेटीआधी हार्दिक यांनी आमदार रोहित पवार यांचीही भेट घेतली होती, असे सांगण्यात येत आहे.

हार्दिक पटेल यांनी गुरूवारी सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. सुमारे २० मिनिटं त्यांनी पवार यांच्याशी चर्चा केली. या भेटीची गुजरातपासून मुंबईपर्यंत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. या भेटीतील चर्चेचा अधिकृत तपशील मिळाला नसला तरी गुजरातमधील सध्याची राजकीय स्थिती, पुढच्या वर्षी होणाऱ्या गुजरात विधानसभेच्या निवडणुका, आरक्षण हे मुद्दे चर्चेत होते, असे कळते. दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केल्याने ते प्रकरण सध्या गाजत आहे. याप्रकरणी महाराष्ट्र सरकारने एसआयटी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. याबाबत एक ट्वीट करून हार्दिक यांनी महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले होते व भाजपवर टीका केली होती. याबाबतही या भेटीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER