अश्लील कंटेंट टेलिकास्ट करण्याच्या आरोपावरून एकता कपूर हिच्या ऑल्ट बालाजीसह सात ओटीटी प्लेटफार्मवर गुन्हा दाखल

अश्लील कंंटेंट बनवणारे प्रॉडक्शन हाऊस, डिझाईन, निर्देशक, अभिनेत्री आणि क्रू मेंबर्सदेखील आरोपी आहेत

ALt Balaji

मुंबई : अश्लील कंटेंट टेलिकास्ट करण्याच्या आरोपावरून प्रोड्यूसर एकता कपूरच्या ऑल्ट बालाजीसह  (ALT Balaji)  सात ओवर द टॉप (ओटीटी) प्लेटफार्म आणि दोन पोर्न वेबसाइटच्या विरुद्ध महाराष्ट्र सायबर डिपार्टमेंटने एफआयआर दाखल केला  आहे. या प्रकरणात अश्लील कंटेंट बनवणारे प्रॉडक्शन हाऊस, निर्माता, निर्देशक, अभिनेता आणि क्रू मेंबर्सनाही आरोपी बनवले आहे.

आयपीसी, आयटी आणि महिलांचे अश्लील चित्रण (निषेध) अधिनियम संबंधित एफआयआर दाखल करण्यात आला  आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईतील पालघर भागात एका इसमाद्वारा महिलांना नोकरीचे आमिष देऊन त्यांच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करून त्यांचे अश्लील व्हिडीओ बनवून राष्ट्रीय,

आंतरराष्ट्रीय पोर्न  साइटवर विकतात, अशी एक घटना समोर आली होती.

या तक्रारीनंतर पोलिसांनी प्राथमिक तपासणी सुरू केली.  त्यानंतर ऑल्ट बालाजी, हॉट-शॉट, फ्लिजमूवीज/फेनिओ/कुकू/नियो फ्लिक्स, उल्लू/हॉटमस्ती, चीकू फ्लिक्स, कुकू, प्राइम फ्लिक्स यासह अश्लील कंटेंट  प्रसारित करणा-या वेबसाइट एक्स-वीडियोज आणि पोर्न हब वेबसाइटच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER