सोन्याचा डोंगर सापडल्याने ग्रामस्थांची अलोट गर्दी; व्हिडीओ व्हायरल

mountain of gold

Congo :- सोने हे मौल्यवान धातू आहे. वाढत्या किमतींमुळे एकीकडे सोने-चांदी घेणे लोकांसाठी अवघड झाले तर दुसरीकडे दिवसागणिक सोन्याची क्रेझही वाढत आहे. काँगोत सोन्याचा डोंगर खोदण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. पत्रकार अहमद अल्गोहबारी यांनी सोन्याने व्यापलेला डोंगर पाहून काँगोच्या ग्रामस्थांना धक्का बसेल, असा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला.

सोने खोदण्याचा व्हिडीओ व्हायरल

काँगोच्या डोंगरावरून सोने खोदण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पत्रकार अहमद अल्गोहबारी यांनी ट्विट करत लिहिले की, “सोन्याने भरलेला डोंगर पाहून काँगोच्या ग्रामस्थांना धक्का बसला. मध्य आफ्रिकेच्या काँगोमध्ये एक डोंगर सापडला आहे, ज्यामध्ये ६० ते ९० टक्के सोने आहे.”

सोने लुटण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी

स्थानिक लोकांना या डोंगराची माहिती मिळताच हजारो ग्रामस्थांनी सोने लुटण्यासाठी धाव घेतली. काँगोच्या बर्‍याच भागात सोन्याचे अस्तित्व आहे. अशा परिस्थितीत तेथे सोन्याची  खाण असणे, ही सामान्य बाब आहे. सोने  लुटण्यासाठी ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली. त्यानंतर सोने मिळवण्यासाठी डोंगरावर होत असलेल्या खाणकामास बंदी घातली. जेणेकरून लोक नोंदणीनंतरच खाणकाम करू शकतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER