भारतात कोरोना महामारीसोबत पत्रकारितेतील गिधाडांचाही धुमाकूळ!

Coronavirus Epidemic India

(भारतावर ओढवलेल्या कोरोना महामारीच्या शोकांतिकेचा माध्यमांमधील हितसंबंधी आपला भारतविरोधी अ‍ॅजेंडा पुढे रेटण्यासाठी कसा स्वार्थीपणाने जगापुढे बाजार मांडत आहेत, याची पोलखोल करणारा ‘दि ऑस्ट्रेलिया टूडे’ या वृत्तपत्रात ४ मे रोजी प्रसिद्ध झालेला हा वृत्तांत, सुजाण भारतीय नागरिकांनी माध्यमांकडे डोळसपणे बघावे, या हेतूने येथे आम्ही अनुवादीत करून पुनर्प्रकाशित करत आहोत-संपादक)

भारतात कोरोना महामारीसोबत पत्रकारितेतील गिधाडांचाही धुमाकूळ!
माझे असे ठाम मत आहे की, वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत म्हणून कोणाचाही मृत्यू होता कामा नये. देशातील वैद्यकीय यंत्रणेवर प्रमाणाबाहेर ताण पडलेला असला आणि ‘कोविड-१९’च्या (COVID-19) दुसर्‍या लाटेत रुग्णांच्या संख्येत न भूतो अशी वाढ होत असताना रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्टर जीवाचे रान करत असले तरी प्रत्येक मृत्यू क्लेषदायक आणि हृदयद्रावकच असतो. त्याच बरोबर भारतात विखारी पत्रकार व बातमीदारही आहेत. सरकारविरुद्धचा आपला अ‍ॅजेंडा राबविण्यासाठी या राष्ट्रीय आपत्तीचेही विकृत चित्र उभे करून ते जखमेवर मीठ चोळम्यचे काम करत आहेत. आपण देत असलेले वृत्तांत खरे आणि ठोस वाटावेत यासाठी सत्याचा विपर्यास करण्यापर्यंतही त्यांची मजल गेली आहे.

त्यांनी ‘कोविड-१९’ आपत्तीचा त्यांनी अपप्रचाराचे हत्यार म्हणून वापर केला
जो कोणी माध्यमांना मुठीत ठेवतो तो जनतेच्या मनावरही नियंत्रण मिळवितो किंवा निदान तसा प्रयत्न तरी करतो, असे म्हटले जाते. कोरोना विषाणूचे नवे वाण आल्याने भारतात सध्या सुरु असलेली ‘कोविड १९’ महामारीची दुसरी लाट पहिल्या लाटेहून अधिक प्राणघातक व विनाशकारी ठरत आहे. या निमित्ताने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बदनमी व मानखंडना करण्याची नामी संधी माध्यमांमधील डाव्या विचारसरणीच्या गिधाडांसाठी चालून आली. त्यांनी त्या संधीचा पुरेपूर फायदा घेत या मानवी आपत्तीचाही आपल्या निहित स्वार्थासाठी बाजार मांडला.

न्यूयॉर्क पोस्टकडून मे २०२० मधील एका गॅस गळतीच्या छायाचित्राचा दुरुपयोग
भारतात सुरु एसलेल्या ‘कोविड-१९’च्या प्राणघातक दुसर्‍या लाटेचीही सनसनाटी बातमी करण्यासाठी ‘न्यूयॉर्क पोस्ट’ने एक हृदय पिळवटून टाकणारे छायाचित्र वाचकांसमोर ठेवले. त्या छायाचित्रात एक स्त्री वेशुद्धावस्थेत पडलेली दिसत होती व दुसरी एक महिला (बहुधा तिची मुलगी असावी) तिला जागे करण्याचा प्रयत्न करत होती. दुसर्‍या लाटेचे संकट किती भीषण आहे, हे वाचकांच्या मनावर बिंबविण्यासाठी हे छायाचित्र वृत्तांतासोबत वापरले गेले. पण यातील धक्कादायक बाब अशी की,  त्या छायाचित्राचा सध्याच्या ‘कोविड-१९’ साथीचा काडीमात्र संबंध नव्हता. दि. ७ मे, २०२० रोजी विशाखापट्टणम जवळील एका गावात एल. जी. पॉलिमर कंपनीच्या रासायनिक कारखान्यात वायू गळती होऊन झालल्या दुर्घटनेचे ते छायाचित्र होते. ‘न्यूयॉर्क पोस्ट’ने या दिशाभूल करणाºया छायाचित्रासह हा वृत्तांत २६ एप्रिल, २०१२१ रोजी प्रसिद्ध केला. त्याचे शीर्षक होते, ‘कोविड भारतात लोकांचा फडशा पाडतोय’ आणि छायाचित्राखालील ओळी होत्या ‘रस्तावर मरून पडलेले लोक’. येथे याची आठवण करून द्यायला हवी की, त्या छायाचित्रातील वायू गळतीच्या घटनेने ३ किमी परिसरातील लोकांना श्वसनाचा त्रास झाला होता.

यावरून नेटिझन्सनी ‘न्यूयॉर्क पोस्ट’चे वाभाडे काढल्यावर त्यांनी फक्त ते छायाचित्र बदलले व मजकूर आणि शीर्षक होते तसेच कायम ठेवले. असे फेक छायाचित्र वापरून भारतातील या दुर्दैवी आपत्तीचा ‘न्यूयॉर्क पोस्ट’ने एवढ्या उत्साहाने व्यापार करण्याचे कारण काय?  की भारताच्या बदनामी मोहिमेचे साधन म्हणून वापरण्यासाठी अशी काही आपत्ती भारतावर ओढविण्याची ते आतूरतेने वाट पाहत होते?

शोकांतिकेचाही बाजार मांडला गेला
भारतात हिंदू्च्या स्मशानभूमीत पेटलेल्या चितांची उदासवाणी छायाचित्रे ‘गेट्टी इमेजेस’ ही ब्रिटिश-अमेरिकन मीडिया कंपनी जगभरातील अ-भारतीय वाचक/ दर्शकांसाठी धडाक्यात विकत आहे. त्यांच्याकडून असे सर्वात मोठया आकाराचे छायाचित्र कोणताही मीडिया ग्रूप प्रत्येकी २३ हजार रुपयाना विकत घेऊ शकतो. त्यामुळे ‘गेट्टी इमेजेस’ला अशी छायाचित्रे पुरवून बख्खळ पैसा कमविण्यासाठी भारतीय वृत्त-छायाचित्रकार किंवा विदेशी फोटाग्राफरांचय कॅमेर्‍यांचे फ्लॅशलाईट एकसारखे चकाकत आहेत. या निर्दयी व्यापार्‍यांनी या दुर्दैवी मृतात्म्यांच्या प्रतिष्ठेचाही मरणोत्तर बाजार मांडला आहे.

मी हे सांगतोय ते अतिशयोक्ती वाटत असेल तर तुम्ही स्वत:  https://www.gettyimages.in/photos/covid-19-delhi-funeral?phrase=covid-19%20delhi%20funeral&sort=mostpopular या लिंकवर क्लिक करून खात्री करून घेऊ शकता.

चिता धगधगत असलेल्या स्मशानघाटांची आकाशातून घेतलेली विहंगम छायाचित्रेही माध्यमांमध्ये पाहायला मिळतात. स्मशनांवरून ड्रोनमध्ये लावलेले कॅमेरे पाठवून त्यांनी ही छायाचित्रे घेतली की काय? शहराच्या स्मशानभूमीवरून असे ड्रोन उडविण्यास परवानगी असते?  ‘दि गार्डियन’ने अशा जळणार्‍या चितेचे आकाशातून घेतलेले असेच एक छायाचित्र प्रसिद्ध करून आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये बरीच खळबळ उडवून दिली. (आम्ही अशी छायाचित्रे वापरलेली नाहीत. कारण अंत्यविधीची छायाचित्रे ही व्यक्तिगत स्वरूपाची असतात व ती कोणीही चव्हाट्यावर मांडू नयेत, असे आमचे ठाम मत आहे.)

बरखा दत्त यांनी वडिलांच्या मृत्यूचाही ‘प्रोपोगंडा’ केला
गिधाडे जमलेली दिसली की, जवळपास कुठे तरी मृतदेह पडलेला असणार हे ओळखता येते. मग बरखा दत्त या तरी स्मशानापासून दूर कसा राहू शकतील? त्यांनी १९ एप्रिल  रोजी थेट सूरतच्या स्मशानभूमीतून एक वृत्तांत प्रक्षेपित केला. मृत्यू, निराशा आणि व्यथेचे व्याकूळ चित्र उभे करण्यासाठी स्मशानाहून दुसरी कुठली चांगली जागा सापडणार! आणि स्मशानातीलही भेसूर गोष्टींचा प्रभावी उपयोग करण्याचा धूर्तपणा बरखा दत्त यांनी नाही दाखवायचा तर कुणी दाखवायचा?

बरखा दत्त यांच्या वडिलांचे ‘कोविड-१९’ने  दुर्दैवी निधन झाले होते. पण त्या दु:खातही बरखा दत्त यांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूचे वर्णन करताना वापरलेला प्रत्येक शब्द त्यांच्या प्रचारी थाटाला साजेसाच होता. शब्दांचा विचारपूर्वक वापर केला की वाचक/ दर्शकांवर त्याचा खोलवर परिणाम होतो. म्हणून तर बरखा दत्त , आपल्या वडिलांचे अखेरचे शब्द , ‘माझा श्वास कोंडतोय, जरा माझ्यावर उपचार करा’ हे  सांगायच्या विसरल्या नाहीत.

पण बरखा दत्त यांनी आपल्या दर्शकांना व ‘सीएनएन’च्या वार्ताहराला हे सांगण्याचे मात्र टाळले की, त्यांच्या वडिलांना मेदान्त हॉस्पिटल या नावाजलेल्या इस्पितळात दाखल केले गेले होते व तेथे उत्तमातील उत्तर डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत होते. तरीही ‘माझा श्वास कोंडतोय, जरा माझ्यावर उपचार करा’, असे सांगत त्यांच्या वडिलांना प्राण सोडावे लागले असतील, हे तुम्हाला पटेल? शिवाय वडिलांचे शेवटचे शब्द ऐकण्यासाठी आपल्याला ‘आयसीयू’मध्ये कसे जाऊ दिले, हेही फकत बरखा दत्तच सांगू शकतात.

बरखा दत्त या पत्रकारितेमधील गिधाडी वृत्तीचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. त्यामुळेच त्या आपल्या वडिलांच्या मृत्यूचाही स्वत:च्या ‘प्रपोगंडा’ साठी उपयोग करू शकतात. बरखा दत्त यांनी विचारावेसे वाटते, ‘मेदान्तसारख्या उत्तम हॉस्पिटलमध्ये उत्तम डॉक्टर उपचार करत असूनही तुमच्या वडिलांनी तुम्ही सांगता ते अखेरचे शब्द उच्चारत प्राण सोडले असतील तर त्यांच्यावर आणखी कोणत्या डॉक्टरांनी उपचार करायला हवे होते, असे तुम्हाला सुचवायचे आहे?  आणि तसे असेल तर ज्यांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळविण्यासाठीही धडपड करावी लागते, त्यांचे काय?

भारतात ‘कोविड-१९’च्या रुग्णांची संख्या न भूतो अशी झपाट्याने वाढते आहे. वैद्यकीय सुविधा व व्यवस्थांवर कमालीचा ताण पडला आहे. रुग्णांना इस्पितळात दाखल होण्यासाठीही मोठे दिव्य पार करावे लागत आहे. तरीही शक्य  होईल तेवढ्या रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी भारतातील आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहे. अशा वेळी माध्यमांचे काम विधायक टीका करण्याचे असते. पण माध्यमे असे काही चित्र उभे करत आहेत की, ज्यांना ‘कोविड-१९’ची सुदैवाने बाधा झालेली नाही त्यांच्या छातीतही धडकी भरत आहे.

-मनिषा इनामदार

(हे लिखाण सर्वप्रथम  www.trunicle.com  येथे प्रसिद्ध झाले होते.)

Source Link : https://www.theaustraliatoday.com.au/besides-covid-19-india-is-also-fighting-with-vulture-journalists-who-are-spreading-more-panic-and-despair-than-pandemic/

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button