जया, हेमा, ऊर्मिला यांच्यासोबतच कंगना ट्विटरवॉरमध्ये मंत्री बच्चू कडूंची एन्ट्री; म्हणाले…

Bachu kadu-Kangana Ranaut

अमरावतीः सुशांत सिंह आत्महत्या (SSR) प्रकरणापासून अभिनेत्री कंगना रणौत फिल्म इन्डस्ट्री, नेपोटिझमनंतर मुंबई पोलीस व त्यानंतर शिवसेनेवर सतत शाब्दिक वार करत आहे. ट्विटरवर तर कंगनाने शिवसेनेविरोधात (Shivsena)   मोर्चाच उभारला आहे. कंगनाच्या ट्विटवर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay raut) सुरुवातीला उत्तर देत राहायचे.  त्यामुळे शिवसेना-कंगना वाद आणखीनच चिघळला होता.

मात्र, कंगना मुंबईत आल्यानंतर शिवसेना नेतृत्वाच्या आदेशाने शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने कंगनाच्या टिवटिवाटाला उत्तर देणे बंद केले व कंगनाचा विषय आमच्यासाठी संपल्याचे जाहीर केले. परंतु, शिवसेनेने जरी कंगनाचा विषय संपवला असला तरी कंगनाला मात्र, शिवसेना, मुंबई, बॉलिवूडवर सतत टीका करण्यात फारच रस असल्याचे दिसून येत आहे. कारण शिवसेनेने विषय संपवला असला तरी कंगनाचा टिवटिवाट थांबलेला नाही.

संसदेतही कंगनाचा विषय चांगलाच गाजत आहे. जया बच्चन (Jaya Bachchan), हेमा मालिनी (Hema Malini) यांनी कंगनाला चांगलेच सुनावले आहे. त्यातच आता मंत्री बच्चू कडू यांनी कंगना रणौतची जोरदार खिल्ली उडवली आहे. बच्चू कडू म्हणाले, कंगनामुळे राज्यातील सरकार अस्थिर होण्याचं कारण नाही. मीडियानंदेखील कंगनाला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. कंगनाला ग्रामपंचायत निवडणुकीत उभं केलं तरी निवडून येणार नाही.

एवढंच नाही तर तिचं डिपॉझिटही जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणावरून बच्चू कडू यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. एखाद्या अभिनेत्रीमागून भाजपा घाणेरडे राजकारण करत आहे हे चुकीचं आहे. कंगनाला आम्ही कवडीची किंमत देत नाही, अशा शब्दांत  बच्चू कडू यांनी कंगना आणि भाजपाला फटकारत राज्यातील सरकार कोसळण्याचा प्रश्न नाही; कारण शिवसेनेचा वाघ तिथं बसलाय, असं त्यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER