यंग अँड ब्युटीफुल त्वचेसाठी वापरा बदाम तेल..

almond

त्वचेसंबंधी समस्यांपासून सुटकारा मिळवण्यासाठी बदाम तेल उपयोगी आहे. बाजारातील केमिकलयुक्त महागडे पदार्थ वापरण्यापेक्षा बदाम तेल अधिक उपयोगी ठरेल. या नैसर्गिक तेलाने  आपल्या सुंदरतेत वाढ होईल. बदामाच्या तेलाने डोळ्याखालील काळे वर्तुळे दूर होण्यात आणि सूज कमी होण्यात मदत मिळते. आपल्या डोळ्याखालील त्वचेवर तेल लावा आणि परिणाम बघा. वाढत्या वयाला टक्कर द्यायची असल्यास बदाम तेल सर्वात उपयोगी ठरेल.हे तेल मधाबरोबर मिसळून प्रभावित जागेवर लावल्याने सुरकुत्या कमी होतात.

almond 2

हे तेल त्वचेवरून मृत त्वचा पेशी काढण्यात मदत करतं. याने मुरूम आणि डाग नाहीसे होतात. बदामाच्या तेलात आढळणारे अँटीऑक्सीडेंट्स आपल्या त्वचेच्या रोम छिद्रांमध्ये साठलेली धूळ आणि अशुद्धी स्वच्छ करतं कारण रोम छिद्र बंद पडल्यास त्वचेसंबंधी समस्या होऊ शकतात.हे तेल आपली त्वचा मॉस्चराइज करतं. कोरडी त्वचा असलेल्या लोकांनी आठवड्यातून दोनदा बदाम तेल वापरल्यास त्यांची त्वचा मुलायम होईल. या तेलाने कुठलेही साईड इफेक्ट होत नाही. तुमचा चेहरा यंग आणि सुंदर दिसेल. तसेच चेहऱ्याच्या तक्रार दूर होतील.