परदेशातील लसींना परवानगी द्या; सगळ्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकला : जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad

मुंबई : कोरोना महामारीमुळे राज्याची परिस्थिती बिकट होत चालली आहे. याला नियंत्रणात आणण्यासाठी १५ दिवस ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत संचारबंदी आदेश लागू केले आहेत. तरीसुद्धा रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. अशा वेळी ठाकरे सरकारने महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी याबाबत आजच निर्णय घ्यावा, यासाठी सर्व मंत्र्यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकला, असे जिंतेद्र आव्हाड यांनी सांगितले.

“आज पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांवर मंत्र्यांनी दबाव टाकला. मंत्र्यांकडून लॉकडाऊनबाबत आजच निर्णय घ्या, असा दबाव टाकण्यात आला. गेल्या वेळी लॉकडाऊन उघडा, असे काही मंत्रीच म्हणायचे. पण सगळे आता आऊट ऑफ कंट्रोल जात आहे. पेटणाऱ्या चिता शांत झोप लागू देत नाहीत. म्हणजे लागणारच नाही. ज्याला हृदय आहे, त्याला या चिता बघून झोप लागणार नाही. त्यामुळे लॉकडाऊन करा, असे मुख्यमंत्र्यांना सांगितले. याबाबत आता काय नियम आणायचे यावर मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. लोक घराबाहेर पडू नये यासाठी जे करता येईल ते करावे लागेल.” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

त्याचबरोबर, भारतातील लसीचे उत्पादन मर्यादित आहे. महाराष्ट्रातील किमान १० कोटी जनतेला लस द्यायची म्हटले तरी देशातील लसी पुरणार नाहीत. त्यामुळे परदेशातील लसींना परवानगी द्या, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button